मराठी फलकांसाठी ग्राहकाचा आग्रह; टीजेएसबी बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद

मराठी भाषेतील फलक लावण्याची प्रक्रिया सुरू; ॲड. ओंकार कुलकर्णी यांच्या मागणीला यश

गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) : टीजेएसबी सहकारी बँकेच्या फोंडा शाखेत मराठी भाषेतील माहितीफलक लावण्याची मागणी बँकेचे ग्राहक ॲड. ओंकार व्ही. कुलकर्णी यांनी केली होती. या मागणीची दखल घेत बँकेने मराठी भाषेतील माहितीफलक लावण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे लेखी कळविले आहे.

ॲड. कुलकर्णी यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बँकेला ई-मेल पाठवून फोंडा शाखेत मराठी भाषेला योग्य स्थान देण्याची मागणी केली होती. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आपण आणि आपले आई-वडील टीजेएसबी बँकेचे खातेदार असल्याचे त्यांनी नमूद केले. बँकेची स्थापना मराठी स्वाभिमानाच्या भावनेतून झालेली असताना फोंडा शाखेत नव्याने लावण्यात आलेले माहितीफलक हिंदी, कोकणी आणि इंग्रजी भाषेत असून त्यात मराठीचा समावेश नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठी भाषेत फलक लावण्यास बँक इच्छुक नसेल, तर आपण आणि आपले कुटुंबीय बँकेतील खाती बंद करून व्यवहार थांबवू, असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच फोंडा शाखेत मराठी भाषेतील फलक नसल्यास इतर ग्राहकांसह बँकेशी व्यवहार बंद करण्याचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

या ई-मेलची दखल घेत टीजेएसबी सहकारी बँकेच्या प्रतिनिधी साक्षी कुडतरकर यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी ॲड. कुलकर्णी यांना उत्तर पाठविले. मराठी भाषेतील माहितीफलक उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योग्य कालावधीत हे फलक लावण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

बँकेच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे मराठी भाषेतील फलक लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष फलक कधी लावले जातील, याची निश्चित तारीख बँकेने दिलेली नाही. त्यामुळे आता बँकेकडून दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते, याकडे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    आसगाव पंचायतीची फेरविचार याचिका फेटाळली; बांधकाम परवान्यासाठी कंपनीचा अल्टिमेटम: सात दिवसांत संरक्षक भिंतीला परवाना द्या, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई; रियागो होम्सचा पंचायतीला इशारा

    मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आसगाव पंचायतीची फेरविचार याचिका फेटाळल्याने कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. रियागो होम्सने आता न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी सात दिवसांत परवाना देण्याची मागणी केली आहे, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

    संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री

    आज नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर शपथविधी ……………………………………………………………………….. गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक असताना मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात वर्णी…

    You Missed

    आसगाव पंचायतीची फेरविचार याचिका फेटाळली; बांधकाम परवान्यासाठी कंपनीचा अल्टिमेटम: सात दिवसांत संरक्षक भिंतीला परवाना द्या, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई; रियागो होम्सचा पंचायतीला इशारा

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2026
    • 10 views
    आसगाव पंचायतीची फेरविचार याचिका फेटाळली; बांधकाम परवान्यासाठी कंपनीचा अल्टिमेटम: सात दिवसांत संरक्षक भिंतीला परवाना द्या, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई; रियागो होम्सचा पंचायतीला इशारा

    मराठी फलकांसाठी ग्राहकाचा आग्रह; टीजेएसबी बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2026
    • 15 views
    मराठी फलकांसाठी ग्राहकाचा आग्रह; टीजेएसबी बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद

    प्रकाशपर्वातून नव्या गोव्याचा संकल्प !

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2026
    • 19 views
    प्रकाशपर्वातून नव्या गोव्याचा संकल्प !

    08/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2026
    • 17 views
    08/11/2026 e-paper

    07/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 12 views
    07/11/2026 e-paper

    संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 23 views
    संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री