श्री खाप्रेश्वराची ९ मे रोजी पुनःप्रतिष्ठापना

मुळगांव श्री वेताळाकडे झाला कौल प्रसाद

पणजी,दि.१२(प्रतिनिधी)-

पर्वरी येथील श्री खाप्रेश्वराच्या मुर्तीची ९ मे रोजी पुनःप्रतिष्ठापना करण्याचा निर्धार देवस्थान समितीने केला आहे. कार्तिक कुडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुळगांव येथील श्री वेताळ देवस्थानात यासंबंधीचा प्रसाद कौल घेतल्याची माहिती दिली. या कार्याला समस्त श्री खाप्रेश्वराच्या भक्तांनी सहकार्य करावे,असे आवाहन कार्तिक कुडणेकर यांनी केले.
श्री खाप्रेश्वराची मुळ स्थानीच पुनःप्रतिष्ठा
आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना पर्वरीत ज्या मुळ स्थानी श्री खाप्रेश्वराची मुर्ती होती तिथे एक छोटीशी घुमटी बांधण्यास सरकार राजी आहे. या व्यतिरीक्त जिथे अन्य भक्तांना प्रसाद कौल झाला आहे तिथेही मंदिर उभारण्याची तयारी सरकारची आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन योग्य तो निर्णय घ्यावा. या विषयावरून गावांतील एकजुटीला बाधा येता कामा नये. सर्व गोष्टी सामंजस्याने आणि चर्चेने सोडवता येतील,असे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले. सरकार याबाबतीत सर्वतोपरी सहकार्य करण्यास राजी आहे,अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
श्री वेताळाचा ९ मे रोजीला कौल
मुळगावातील श्री वेताळाकडे श्री खाप्रेश्वराचा प्रसाद कौल होतो. आज देवस्थानची समिती कार्तिक कुडणेकर यांच्या नेतृत्वाखाली श्री वेताळाकडे कौल प्रसादाकडे गेले असता तिथे ९ मे २०२५ रोजी पुनःप्रतिष्ठापनेसाठी कौल प्रसाद झाल्याची माहिती त्यांनी दिली. याठिकाणी श्री खाप्रेश्वर आणि ब्राह्मणाचे वास्तव आहे. आता शिमगोत्सव सुरू होणार असल्याने या काळात कौल प्रसाद होत नाही. आज देवस्थान समितीने वेगवेगळ्या तारखा देवापुढे सादर केल्या असत्या ९ मे रोजीच्या दिवसाला पसंती मिळाली. राज्यभरातील भक्तगणांच्या सहकार्याने याठिकाणी मुर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचेही कार्तिक कुडणेकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    ʻमै झुकेगा नही सालाʼ !

    या एक वर्षाच्या प्रवासात आपण जशी साथ दिली, तशीच ती पुढेही चालू राहिली आणि त्यात अधिक भर पडली तर नक्कीच हा ʻगांवकारीʼचा प्रयोग मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचा एक नवा मानबिंदू ठरू…

    पिता-पुत्राकडून ‘स्मार्टसिटी’ चे वाभाडे

    भाजप सरकार, पक्षाचीही कोंडी गांवकारी,दि.१०(प्रतिनिधी) राजधानी पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात तसेच पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात या पिता-पुत्रांनी पणजी स्मार्टसिटीच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे सरकार आणि भाजप…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    समग्र शिक्षा: कला शिक्षकांचा संघर्ष

    • By Gaonkaari
    • एप्रिल 26, 2025
    • 3 views
    समग्र शिक्षा: कला शिक्षकांचा संघर्ष

    आम्ही भारताचे लोक

    • By Gaonkaari
    • एप्रिल 26, 2025
    • 3 views
    आम्ही भारताचे लोक

    26/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 26, 2025
    • 3 views
    26/04/2025 e-paper

    25/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 25, 2025
    • 5 views
    25/04/2025 e-paper
    error: Content is protected !!