पोलिसांनी पुजाला ठरवले खोटारडी !

पुराव्याविना आरोप; १४ दिवसांत तपासाचा निकाल



गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख आरोपी पुजा नाईक हिने नुकतेच केलेल्या सनसनाटी आरोपांना कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी तपासादरम्यान तिने ही नावे घेतली नव्हती, ती आता नव्याने घेतली आहेत. त्यामुळे पोलिसांनी अप्रत्यक्षपणे तिला खोटारडी ठरवले आहे. पुढील १४ दिवसांत तिच्या आरोपांची चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
राज्यात खळबळ उडवलेल्या या प्रकरणामुळे सरकार आणि पोलिस यंत्रणा अडचणीत सापडली आहे. पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पुजा नाईक हिने घेतलेल्या तीन नावांबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले. तिने एका मंत्र्याचे नाव घेतले असले तरी त्या मंत्र्याने केवळ दोन अधिकाऱ्यांकडे तिची ओळख करून दिल्याचे म्हटले आहे. या अधिकाऱ्यांची नावे पुरावे मिळाल्यानंतरच उघड करता येतील. चौकशी सुरू असून गरज पडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केल
नावे पहिल्यांदाच घेतली
पुजा नाईक हिने यापूर्वीच्या तपासात ही नावे कधीही घेतली नव्हती. ती आता प्रथमच घेतली जात असल्याचे पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले. यावरून पुजा नाईक खोटारडेपणा करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप पोलिसांनी केला आहे. पर्वरीतील ज्या फ्लॅटमध्ये पैशांचे व्यवहार झाल्याचा आरोप तिने केला होता, तिथे तिला नेण्यात आले. मात्र त्या फ्लॅटच्या मालकाने हे आरोप फेटाळून लावले. तिने घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीतही कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पुरावे मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले.
“ढवळीकर पैसे घेणार नाहीच” – केतन भाटीकर
मगोचे नेते आणि वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांच्यावर सरकारी नोकरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप झाला असला तरी त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे मगोचे नेते केतन भाटीकर यांनी सांगितले. ढवळीकर यांच्याशी काही राजकीय मतभेद असले तरी त्यांच्या कामाची आणि कार्यपद्धतीची चांगली माहिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुजा नाईक हिने घेतलेली नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरी त्या मंत्र्याचा उल्लेख सुदीन ढवळीकर यांच्याशी संबंधित असल्याचे समजून अनेकजण त्यांची पाठराखण करत आहेत.

  • Related Posts

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    खाजगी बस मालक आंदोलनाच्या पवित्र्यात गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) राज्यातील खासगी बस मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे…

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत घाईघाईने निर्णय न घेता जनमत घ्यावे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत मूलभूत प्रश्न सोडवावे अशी त्यांची मागणी आहे.

    You Missed

    AAP Demands Waiver of Power Bills, 300 Free Units and 24×7 Electricity Supply

    AAP Demands Waiver of Power Bills, 300 Free Units and 24×7 Electricity Supply

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    22/06/2026 e-paper

    22/06/2026 e-paper

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी