वादग्रस्त कलम ३९ (ए) रद्द करा

शिरदोन – पाळेवासियांचा टीसीपी कार्यालयात ठिय्या

गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)

सांतआंद्रे मतदारसंघातील शिरदोन-पाळे पंचायत क्षेत्रातील सुमारे ८५ हजार चौ.मी. जमीन वादग्रस्त नगर नियोजन कलम ३९(ए) वापरून झोन बदल करून त्यातील काही भाग सेटलमेंट क्षेत्रात रूपांतरित करण्यात आला आहे. या जागेत मेगा प्रकल्प उभारला जाणार असल्याने हे भूरूपांतर तात्काळ रद्द करून जमीन पूर्ववत करावी आणि वादग्रस्त कलम ३९(ए) रद्द करावे, अशी मागणी शिरदोन-पाळेवासियांनी केली आहे.
सकाळी पाटो येथील नगर नियोजन खात्यावर मोर्चा काढल्यानंतर ग्रामस्थांनी थेट मुख्य नगर नियोजकांच्या कार्यालयात प्रवेश करून ठिय्या दिला. घोषणांनी संपूर्ण कार्यालय दणाणून गेले.
सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनीही या मोर्चात सहभागी होऊन लोकांना पाठिंबा दिला. मतदारसंघात नगर नियोजन कायदा ३९(ए) अंतर्गत सुमारे २ लाख चौ.मी. पेक्षा अधिक जमिनींचा झोन बदल करण्यात आला आहे. झोन बदल करून या जमिनींचे सेटलमेंट क्षेत्रात रूपांतर करून विविध प्रकल्प उभारण्याची लगबग सुरू झाली आहे.
या मेगा प्रकल्पांमुळे शिरदोन-पाळे पंचायत क्षेत्रात अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहेच, पण पर्यावरण, जलस्त्रोत, शेती, बागायती यांवरही विपरीत परिणाम होणार आहे. स्थानिकांचा विचार न करता थेट निर्णय लादले जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली. विकासबाह्य डोंगर व जैवसंवेदनशील क्षेत्राचा झोन बदल करणे चुकीचे असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
या भागांत आदिवासी समाज वास्तव्य करतो. सरकार आदिवासी समाजाला अशिक्षित किंवा अनाडी समजत असेल तर ती मोठी चूक ठरेल. “आम्हाला आमच्या पालकांनी शिक्षण दिले आहे आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर आम्ही सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडू,” असा इशारा तुषार गांवस यांनी दिला.
कार्यालयात ठिय्या
मुख्य नगर नियोजक व्हर्टिका डागोर यांच्या कार्यालयात मोर्चेकरांनी प्रवेश करून जोरदार घोषणाबाजी केली. “जोपर्यंत झोन बदल रद्द करणारा आदेश जारी होत नाही, तोपर्यंत हे कार्यालय मोकळे केले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. यासंबंधीचे विस्तृत निवेदनही त्यांना सादर करण्यात आले.
गांवस यांनी यावेळी विविध सर्वे क्रमांकांचा तपशील वाचून दाखवला. किती सर्वे क्रमांकांचे झोन बदलले आहेत आणि किती जमीन रूपांतरित केली आहे, याचा हिशेब त्यांनी स्पष्ट केला.

  • Related Posts

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत घाईघाईने निर्णय न घेता जनमत घ्यावे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत मूलभूत प्रश्न सोडवावे अशी त्यांची मागणी आहे.

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    मडगाव,दि.२२ जून : कारे कायदा महाविद्यालयातील बीएएलएलबी प्रवेश प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत तत्कालीन प्राचार्य साबा डीसिल्वा यांना जबाबदार धरण्यात आले असून, विद्या विकास मंडळाने त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगितल्याची…

    You Missed

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A