महानगरपालिकेचे बाबुशच सिकंदर

२७ जागांसह निर्विवाद वर्चस्व

गांवकरी, दि. १३ (प्रतिनिधी)

राज्यातील एकमेव पणजी महानगरपालिकेचे बाबुश मोन्सेरात हेच सिकंदर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ३० पैकी तब्बल २७ जागा जिंकत भाजप पुरस्कृत बाबुश मोन्सेरात गटाने निर्विवाद यश संपादन केले. विरोधकांनी एकत्र येऊन उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या आमी पणजेकार गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. पणजी आणि ताळगांव मतदारसंघांसाठी भाजपला मोन्सेरातांशिवाय पर्याय नाही, हे या निवडणुकीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
मतमोजणीला सुरुवात होताच बाबुश मोन्सेरात गटाने आघाडी घेतली. ताळगांव विधानसभा मतदारसंघातील १ ते ९ प्रभागांपैकी ८ जागा बाबुश गटाने जिंकल्या, तर एकमेव लियोनिद फुर्तादो हे आमी पणजेकार गटातून विजयी ठरले. पणजी विधानसभा मतदारसंघातील २१ प्रभागांपैकी बाबुश गटाने १९ जागा मिळवल्या, तर आमी पणजेकार गटाला केवळ २ जागा प्राप्त झाल्या. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि माजी नगरसेविका शीतल नाईक यांचा पराभव आमी पणजेकार गटासाठी धक्कादायक ठरला.
अनेक प्रभागांत बाबुश गटाच्या उमेदवारांचा विजय झाला असला तरी आमी पणजेकार गटाला चांगली मते मिळाल्याने विधानसभा निवडणूक ही एकतर्फी होणार नाही, हे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
भाजपचा जल्लोष
फोंडा पोटनिवडणुकीच्या तोंडावर पणजी मनपा निवडणुकीतील विजय हा भाजपसाठी फायद्याचा ठरला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे अभिनंदन करून विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विजयी उमेदवारांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शुभेच्छा देणार आहेत.
“हा भाजपचा विजय आहे. मतदारांना कुणीही गृहीत धरू नये. मतदारांशी कायम संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणींना धावून जाणे हे प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य आहे,” असे बाबुश मोन्सेरात म्हणाले.
रोहीत मोन्सेरात यांनी मतदारांचे आभार मानले आणि उत्पल पर्रीकर यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. “मतदारांचा कौल स्वीकरणे हे लोकशाहीत आपले कर्तव्य आहे. या कौलाचे विश्लेषण केले जाईल,” अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.

मनपाचे नवनिर्वाचित नगरसेवक
१- युतिका जांबावलीकर
२- करोलिना पो
३- मार्गारिडा फर्नांडिस
४- रोहीत मोन्सेरात
५- किशोर शास्त्री
६- बेंटो सिल्वेस्टर
७- लियोनिद फुर्तादो (आमी पणजेकार)
८- करीना शिरोडकर
९- कबीर मखिजा पिंटो
१०- प्रसाद आमोणकर
११- तुकाराम चिन्नानावर
१२- वर्षा शेटये
१३- उदय मडकईकर
१४- प्रज्योत वायंगणकर
१५- शायनी चोपडेकर
१६- अस्मिता केरकर
१७- जॅक सुखिजा(आमी पणजेकार)
१८- कृष्णा शिरोडकर
१९- निखिता नाईक
२०- शुभम चोडणकर
२१- मनिषा मणेरकर
२२- दिक्षा माईंणकर
२३- विद्या गडकर
२४- करण पारेख
२५- किर्ती साखळकर
२६- वसंत आगशीकर
२७- विठ्ठल चोपडेकर
२८- रूपेश हळर्णकर
२९- लिब्रेटा मेंडिस(आमी पणजेकार)
३०- सिल्वेस्टर फर्नांडिस

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 10 views
    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 23 views
    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 16 views
    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 19 views
    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    गडकरींना काळे झेंडे दाखवणार