शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

गोव्यात प्रथमच विशेष आध्यात्मिक अनुष्ठान; सामूहिक ध्यान, साधना आणि आत्मसाक्षात्कारावर भर

शिरोडा, दि. १५ (प्रतिनिधी) : गोव्यात प्रथमच शारदीय नवरात्रानिमित्त विशेष आध्यात्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले असून, शिरोडा येथील कुमड परिसरातील हिमालयन समर्पण ध्यानस्थळी ११ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अनुष्ठान सुरू आहे. सामूहिक ध्यान, आध्यात्मिक साधना, अंतःशांती आणि आत्मसाक्षात्कार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी यांच्या ८०० वर्षांच्या हिमालयीन ध्यानयोग परंपरेतून प्रेरणा घेऊन या अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीशक्तीचे केवळ बाह्य स्वरूपात पूजन करण्याऐवजी प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंतर्मनातील शक्ती जागृत करावी, हा संदेश या साधनेतून दिला जात आहे.

अनुष्ठानादरम्यान दररोज सकाळी ९ वाजल्यापासून विशेष ध्यान व साधना सत्रे आयोजित केली जात आहेत. तसेच परमवंदनीया गुरुमाँ यांच्या उपस्थितीत दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सामूहिक ध्यान आणि विशेष आध्यात्मिक कार्यक्रम होत आहेत.

नवरात्र साधना ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मचिंतन, आत्मजागृती आणि वैश्विक एकतेची अनुभूती देणारी आध्यात्मिक प्रक्रिया असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या उपक्रमातून समर्पण, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हिमालयन समर्पण ध्यानस्थळी सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून, अनुष्ठानात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. गोव्यातील साधकांसह आध्यात्मिक साधनेची आवड असलेल्या सर्व नागरिकांनी या विशेष अनुष्ठानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • Related Posts

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    शेतकऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) गेल्या शंभर वर्षांपासून कसत असलेल्या आल्वारा जमिनी, गांवठण जमीनी, वन्यजीव क्षेत्रातील जमिनी, मोकासो जमिनी आदी विषयांवरून आणखी किती पिढ्या प्रतीक्षा करायची, असा…

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    Over 1,500 Alvara holders yet to apply for regularisation; farmers seek Class-I occupancy rights, relaxation of documentation requirements and extension of application deadline

    You Missed

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 13 views
    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    15/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 22 views
    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 28 views
    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 25 views
    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 26 views
    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 25 views
    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process