राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)

गोव्यावरील कर्जाचा डोंगर तब्बल ३८ हजार कोटी रुपयांवर पोहोचला असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जनतेच्या मूलभूत गरजांपेक्षा सरकारी सोहळे आणि इव्हेंटबाजीवर अधिक भर देत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल म्हांबरे यांनी केला. राज्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनत असतानाही सरकार खर्चाच्या प्राधान्यक्रमाबाबत गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.
विधानसभा अधिवेशनात कर्ज घेतले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर लगेचच राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांचे नवे कर्ज कसे घेतले, असा सवाल काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी उपस्थित केला. अधिवेशनानंतर सरकारने ७०० कोटींचे कर्ज उचलल्याचा दावा करत त्यांनी भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. वाढत्या कर्जाच्या बोजामुळे गोव्याची आर्थिक स्थिती संकटाकडे वाटचाल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सीजेपी आंदोलनाची डीजीपींमार्फत चौकशी करा !
सीजेपीच्या आंदोलनादरम्यान कथितरीत्या देण्यात आलेल्या ‘हिंदुत्व मुर्दाबाद’ घोषणेची पोलीस महासंचालकांच्या स्तरावर सखोल चौकशी करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेसने केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करून एसआयआरसंबंधी प्रश्न आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार नियोजनबद्धरीत्या घडवण्यात आल्याचा संशय काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील सत्य समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

  • Related Posts

    गोंयकारांना केजरीवालांच्या सहा गॅरंटी!

    गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीय जनतेसाठी सहा महत्त्वाच्या गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पणजी…

    नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!

    गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) आपल्या भारदस्त आवाजाने, बेधडक व्यक्तिमत्त्वाने आणि कसदार अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले.…

    You Missed

    15/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 21 views
    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 24 views
    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 24 views
    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 24 views
    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 22 views
    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    आदिवासी निधीतील कथित गैरव्यवहारावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 17 views
    आदिवासी निधीतील कथित गैरव्यवहारावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल