‘सरकार म्हणजे वसुली एजंट नाही`

महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांची स्वतंत्र चौकशीची मागणी

पणजी,दि.१५(प्रतिनिधी)

सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन लोकांची लुबाडणूक करणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी सरकार वसुली एजंट नाही. या घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी हवी आणि पैसे घेणाऱ्यांसह पैसे देणाऱ्यांवरही गुन्हे नोंद व्हायला हवेत,अशी आग्रही मागणी महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी केली. टाईम्स ऑफ इंडियाने आज हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. .
विरोधी काँग्रेस तथा इतर पक्षांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी होत असतानाच आता सरकारात मंत्री असलेले बाबुश मोन्सेरात यांनीही तोच सुर आवळला आहे. अलिकडेच एक ऑडीओ व्हायरल झाला आहे. या ऑडिओत एक आमदार आपण नोकरीसाठी मोन्सेरात यांना ७ लाख रूपये दिल्याची कबुली देत आहे. या ऑडिओमुळे बाबुश मोन्सेरात बरेच खवळले आहेत. या ऑडिओच्या तपासाची मागणी त्यांनी पक्ष तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. आता सरकारातील मंत्र्यांकडूनच या घोटाळ्याच्या स्वतंत्र चौकशीची मागणी सुरू झाल्यामुळे सरकार आणि भाजप पक्ष संघटनेसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दोन्ही घटक जबाबदार
सरकारी नोकरीसाठी पैसे घेणारा जसा जबाबदार तसाच पैसे देणाराही जबाबदार आहे. उमेदवाराची गुणवत्ता आणि इतर आवश्यक पात्रता निकष परिपूर्ण नसल्यामुळे पैशांच्या सहाय्याने पात्र उमेदवाराची संधी हिसकावणे हा देखील अन्याय आहे आणि यामुळे नोकऱ्यांसाठी पैसे देणाऱ्यांवरही गुन्हे नोंद होण्याची गरज आहे. या लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तर ते पुढे आले असते काय. नोकऱ्यांसाठी पैसे देणाऱ्यांनाही वचक बसालया हवा आणि त्यामुळे या दोन्ही बाजूंच्या लोकांवर कारवाई गरजेची आहे, असेही बाबुश मोन्सेरात म्हणाले.
सरकारने वसुली का करावी ?
या प्रकरणी गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून पैशांची वसुली करण्यासाठी सरकार वसुली एजंट थोडेच आहे. कायद्याने ते शक्य आहे काय,असा सवाल बाबुश मोन्सेरात यांनी करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानाची हवाच काढून घेतली. पैसे घेणारे जेवढे जबाबदार तेवढेच पैसे देणारेही जबाबदार आहेत,असेही ते म्हणाले.
जाहीर माफी
सोशल मीडियावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी तथा भाजप नेत्या सुलक्षणा सावंत यांचा फोटो वापरून त्यांची बदनामी करणारा एक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर सदर पोस्ट मागे घेतल्याचे तसेच जाहीर माफी मागत असल्याचे एक वास्कोस्थित नागरिकाचे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे.

  • Related Posts

    “मला नोकऱ्या द्या, तरच थांबेन!”

    आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा सूचक इशारा गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) “सरकारला माझी गरज असेल तर मला रोजगार हवा आहे. सत्तरीसाठी मला सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. या नोकऱ्या मिळाल्या तरच मी तुमच्यासोबत…

    ये पैसा बोलता है…

    काही आमदारांनी पैशांचा बाजार मांडून लोकांना संमोहीत केले आहे. या बाजारात नीतिमूल्ये, प्रामाणिकपणा किंवा नैतिकतेला किंमत उरलेली नाही. हल्लीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाला आहे. जॉन्सन डिसील्वा यांच्या नावाने…

    You Missed

    29/04/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 29, 2026
    • 16 views
    29/04/2026 e-paper

    सरकारच्या प्रामाणिकपणाची कसोटी

    • By Gaonkaari
    • एप्रिल 29, 2026
    • 14 views
    सरकारच्या प्रामाणिकपणाची कसोटी

    लोढा प्रकरणी ‘सेटलमेंट’ची भाषा !

    • By Gaonkaari
    • एप्रिल 29, 2026
    • 19 views
    लोढा प्रकरणी ‘सेटलमेंट’ची भाषा !

    Centre Grants Approval for Goa Veterinary College at Ponda

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 11 views
    Centre Grants Approval for Goa Veterinary College at Ponda

    GMC Issues Notice Over Illegal LPG Parking in Residential Quarters

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 11 views
    GMC Issues Notice Over Illegal LPG Parking in Residential Quarters

    भाजपचे डबल स्टॅंडर्ड राजकारण

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2026
    • 11 views
    भाजपचे डबल स्टॅंडर्ड राजकारण