उटा मेळाव्याला परवानगी नाकारली

आता १३ रोजीचा मेळावा म्हार्दोळात

गांवकारी,दि.११(प्रतिनिधी)

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण देण्याची प्रक्रिया २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करून आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांनी युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्स (उटा)च्या नेतृत्वाखाली १३ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर बोलावलेल्या मेळाव्याला सरकारने परवानगी नाकारली आहे. आता हा मेळावा म्हार्दोळ येथील क्रांती मैदानावर होईल,अशी घोषणा संघटनेने केली आहे.
उटाचे नेते प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आरक्षणासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पुढे गेली असली तरी केवळ कायदा किंवा घोषणा पुरेशी नसून आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष आरक्षित मतदारसंघ अस्तित्वात आले पाहिजेत, अशी संघटनेची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

२०२७ची गोवा विधानसभा निवडणूक एसटी राजकीय आरक्षण लागू करूनच घेण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी वेळीप यांनी केली. यासाठी आवश्यक मतदारसंघ फेररचना व इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

धनगर समाज एसटी दर्जासाठी आक्रमक
दरम्यान, गोव्यात एसटी राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच धनगर समाजानेही अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याची मागणी पुन्हा जोरकसपणे पुढे आणली आहे.
धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. या भेटीत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासंबंधीचे निवेदन नाईक यांना सादर करण्यात आले.
धनगर समाजाचा एसटी यादीत समावेश करण्याची मागणी दीर्घकाळ प्रलंबित असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारच्या पातळीवर या विषयाचा पाठपुरावा होणे आवश्यक असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुन्हा भेट घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने दामू नाईक यांच्याकडे केली. धनगर समाजाच्या या विषयाबाबत केंद्राकडून अभ्यास सुरू आहे,असे दामू नाईक यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

    १० मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रह गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) ‘इनफ इज इनफ, गोवा’ चळवळीतर्फे येत्या १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जागृती निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी चळवळीच्या…

    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) held a strategic planning meeting with representatives from all 40 Assembly constituencies to strengthen grassroots organisation and prepare for future elections.

    You Missed

    उटा मेळाव्याला परवानगी नाकारली

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 11, 2026
    • 15 views
    उटा मेळाव्याला परवानगी नाकारली

    11/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 11, 2026
    • 10 views
    11/08/2026 e-paper

    दिवसाढवळ्या दरोडा…

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 11, 2026
    • 8 views
    दिवसाढवळ्या दरोडा…

    अति तिथे माती !

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 30 views
    अति तिथे माती !

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 21 views

    सांगेतील वादावर पडदा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 17 views
    सांगेतील वादावर पडदा