कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण अधिसूचनेत स्पष्टता नाही

गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)

दहा वर्षांहून अधिक काळ कंत्राटी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचे स्वागत आहे; मात्र त्यात पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत स्पष्टता नसल्याने त्यांच्यावर पुन्हा अन्याय होण्याची भीती आहे, असे कामगार नेते अॅड. अजय प्रभूगांवकर यांनी म्हटले आहे.

पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी १४ एप्रिलपासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा निर्णय घेतला. मात्र ज्या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी आंदोलन उभारले, त्यांच्याच नियमितीकरणाबाबत नव्या अधिसूचनेत स्पष्ट उल्लेख नसल्याकडे प्रभूगांवकर यांनी लक्ष वेधले.

सध्याच्या अधिसूचनेतील तरतुदींचा तांत्रिक आधार घेऊन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना नियमितीकरणापासून वंचित ठेवले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सरकारने तातडीने याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रश्नावर सोमवारी संबंधित मंत्र्यांची पुन्हा भेट घेण्यात येणार आहे. पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र अधिसूचना काढावी की अन्य मार्गाने त्यांना नियमितीकरणाचा लाभ द्यावा, यावर चर्चा केली जाणार असल्याचे प्रभूगांवकर यांनी सांगितले. हा विषय आणखी ताणला जाऊ नये आणि सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सोसायटीचे कर्मचारी गेली १० ते २५ वर्षे कंत्राटी तत्त्वावर काम करीत असून त्यातील काही जण आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करूनही त्यांना समान वेतन व इतर सेवासुविधांचा लाभ मिळत नसल्याचा दावा प्रभूगांवकर यांनी केला.

पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीअंतर्गत दोन हजारांहून अधिक कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यातील सुमारे २९१ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश दिले होते. त्याच तत्त्वावर उर्वरित कर्मचाऱ्यांनाही नियमित करावे, अशी मागणी प्रभूगांवकर यांनी केली.

  • Related Posts

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    A Goa Police employee is seeking a criminal investigation into his wife’s suicide, alleging sustained harassment by a third person pushed her into severe mental distress. Despite a detailed complaint submitted, no FIR has been registered yet.

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    Residents of Milroc Kadamba at Bainguinim, Old Goa, have raised serious concerns over a suspected unauthorised hazardous casting yard operating in a residential area, alleging excessive noise, dust, fumes, and safety risks. They demand immediate inspection and a stop-work order if necessary permissions are not produced.

    You Missed

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 12 views
    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    02/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 16 views
    02/10/2026 e-paper

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 19 views
    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 19 views
    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण अधिसूचनेत स्पष्टता नाही

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 19 views
    कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण अधिसूचनेत स्पष्टता नाही

    काँग्रेसची यात्रा आज साखळीत फिरणार

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 8 views
    काँग्रेसची यात्रा आज साखळीत फिरणार