गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत? चौकशीच्या मागणीसाठी विश्वेश प्रभू परब यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा मानव संसाधन विकास महामंडळामार्फत (जीएचआरडीसी) विविध सरकारी खात्यांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विश्वेश अशोक प्रभू परब यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या बारा वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना दरमहा केवळ १३ हजार ते २४ हजार रुपये वेतन दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या वेतनाची रक्कम ४१ हजार रुपयांहून अधिक असल्याचा दावा परब यांनी केला आहे. मंजूर वेतन आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मिळणारी रक्कम यामध्ये एवढी मोठी तफावत का आहे, याचे स्पष्टीकरण महामंडळाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

विशेष म्हणजे, या कथित अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाते किंवा त्यांना सेवेतून कमी केले जाते, असा आरोपही परब यांनी केला आहे. नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अनेक कर्मचारी गप्प राहण्यास भाग पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या दशकाहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना थकीत वेतन, सहाव्या वेतन आयोगाचे लाभ आणि सेवेत नियमितीकरणाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. सत्तरीसह संपूर्ण गोव्यातील युवकांवर होणाऱ्या कथित अन्यायाची सरकारने तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे आवाहन परब यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

  • Related Posts

    प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक

    केंद्र सरकारने मंजुरी दिलेले ५० एमबीबीएस जागांचे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ‘मडगावचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळण्याबरोबरच दक्षिण गोव्यातील जनतेला प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकतील.

    मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

    बनावट अबकारी आयुक्त, कॅश फॉर जॉब आणि पर्वरी गोळीबार प्रकरणावरून सरकारवर गंभीर आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणांची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणात गैरव्यवहार आणि फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्यावरून निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

    You Missed

    प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 14 views
    प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक

    मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 15 views
    मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

    Goa Protection of Agricultural Lands Act, 2026: Justice Ferdino Rebello’s Draft Bill Sets the Stage for a Major Debate Ahead of Assembly Elections

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 17 views
    Goa Protection of Agricultural Lands Act, 2026: Justice Ferdino Rebello’s Draft Bill Sets the Stage for a Major Debate Ahead of Assembly Elections

    आदिवासी हुतात्म्यांच्या नावाने सरकारी निधीची उधळपट्टी? प्रेरणा दिनाच्या सोहळ्यावर ४.४० कोटींचा कथित खर्च, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 18 views
    आदिवासी हुतात्म्यांच्या नावाने सरकारी निधीची उधळपट्टी? प्रेरणा दिनाच्या सोहळ्यावर ४.४० कोटींचा कथित खर्च, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

    कुडचडे, हळदोण्यात भाजपात हलचल

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 24 views
    कुडचडे, हळदोण्यात भाजपात हलचल

    भाजप नेतृत्वाला पर्याय आहे का ?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 31 views
    भाजप नेतृत्वाला पर्याय आहे का ?