कुडचडे, हळदोण्यात भाजपात हलचल

सिद्धार्थ गांवस देसाई, संदीप साळगांवकर सक्रिय

गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत हालचालींना वेग आला असून, कुडचडे आणि हळदोणा मतदारसंघांत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कुडचडेचे विद्यमान आमदार निलेश काब्राल यांना उमेदवारी नाकारल्यास त्यावर आपलाच पहिला हक्क असेल, असा दावा दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गांवस देसाई यांनी केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या हळदोणा मतदारसंघात जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगांवकर यांनी जनसंपर्क वाढविला असून, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याकडून त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही उमेदवारांना पुन्हा संधी मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे तर काही विद्यमान आमदारांचीही उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता पक्षांतर्गत चर्चेत व्यक्त होत असल्याने इच्छुकांमध्ये हालचाली वाढल्या आहेत.

कुडचडेत उमेदवारीसाठी रस्सीखेच

कुडचडे मतदारसंघात आमदार निलेश काब्राल यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. काब्राल विद्यमान आमदार असतानाही रोहन गांवस देसाई यांनी मतदारसंघात स्वतंत्रपणे राजकीय काम सुरू ठेवल्याने काब्राल समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे समजते. हा विषय पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचूनही रोहन गांवस देसाई यांची सक्रियता कायम असल्याने उमेदवारीबाबत विविध शक्यता वर्तविल्या जात आहेत.

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गांवस देसाई यांनीही उमेदवारीवर आपला दावा स्पष्ट केला आहे. काब्राल यांना उमेदवारी नाकारल्यास पक्षाने आपल्यालाच प्राधान्य द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड करण्याची तयारी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हळदोण्यात संदीप साळगांवकरांची मोर्चेबांधणी

उत्तर गोव्यात काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या हळदोणा मतदारसंघात भाजपकडून संदीप साळगांवकर यांचे नाव चर्चेत आले आहे. साल्वादोर द मुंदचे माजी सरपंच, पेन्हा द फ्रान्सचे जिल्हा पंचायत सदस्य आणि पर्वरी भाजप मंडळाचे उपाध्यक्ष असलेल्या साळगांवकर यांनी हळदोण्यात जनसंपर्क वाढविला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे साळगांवकर यांना त्यांच्या पाठिंब्यामुळे उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • Related Posts

    गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत? चौकशीच्या मागणीसाठी विश्वेश प्रभू परब यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    सामाजिक कार्यकर्ते विश्वेश प्रभू परब यांनी गोवा मानव संसाधन विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. कर्मचाऱ्यांना मंजूर वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    Bardez Bazaar Asked to Vacate Mapusa Premises; Political Motive Behind Notice to Khalap Family?

    A government notice directs the Bardez Bazaar Consumers’ Co-operative Society Ltd. to vacate its premises in Mapusa, citing an expired lease and plans for a new administrative complex. The timing, nearly nine years after the lease expired and amidst the Khalap family’s political prominence, raises questions about potential political motivations behind the administrative action.

    You Missed

    कुडचडे, हळदोण्यात भाजपात हलचल

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 17 views
    कुडचडे, हळदोण्यात भाजपात हलचल

    भाजप नेतृत्वाला पर्याय आहे का ?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 25 views
    भाजप नेतृत्वाला पर्याय आहे का ?

    गोव्याची जमीन वाचवण्यासाठी ‘कृषी जमीन संरक्षण कायदा २०२६’

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 13 views
    गोव्याची जमीन वाचवण्यासाठी ‘कृषी जमीन संरक्षण कायदा २०२६’

    गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत? चौकशीच्या मागणीसाठी विश्वेश प्रभू परब यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 21 views
    गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत? चौकशीच्या मागणीसाठी विश्वेश प्रभू परब यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    Bardez Bazaar Asked to Vacate Mapusa Premises; Political Motive Behind Notice to Khalap Family?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 13, 2026
    • 23 views
    Bardez Bazaar Asked to Vacate Mapusa Premises; Political Motive Behind Notice to Khalap Family?

    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 12, 2026
    • 23 views
    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan