काँग्रेसची हाराकिरी; आरजीपी आक्रमक

आघाडीचे भवितव्य संदिग्ध, गोवा फॉरवर्ड सावध



गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी):
महा विरोधी आघाडीची घोषणा केलेल्या काँग्रेस पक्षाने आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला विश्वासात न घेता किंवा कल्पना न देता थेट आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आघाडीच्या उमेदवारांची घोषणा संयुक्तरित्या होणे अपेक्षित होते. काँग्रेसची ही कृती विश्वासघातकी ठरली असून, यापुढे आघाडीवरून कुणालाही आरजीपीला दोष देता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी केली
समिती बैठक आणि…
काँग्रेसच्या जिल्हा पंचायत निवडणूक समितीची बैठक सोमवारी संध्याकाळी पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी आघाडीबाबत आणि उमेदवारांबाबत घोषणा करू, असे सांगितले होते. या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर उपस्थित होत्या. बैठक आटोपूनही रात्री उशिरापर्यंत कोणतीही घोषणा किंवा उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मात्र आज मंगळवारी सकाळी अचानक ११ उमेदवारांची यादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जाहीर केली.
भाजपची उर्वरित यादी आज
भाजपने पहिल्या टप्प्यात १९ उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज संध्याकाळी उशिरापर्यंत उर्वरित उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तीन ठिकाणी मगोला उमेदवारी देण्यात येणार असून इतर ठिकाणी अपक्ष उमेदवारांना पाठींबा दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

करमळी मेगा प्रकल्पाविरोधात आंदोलन
५ डिसेंबर रोजी पाहणी करण्याचे टीसीपीचे आश्वासन
गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी):

कुंभारजुवे मतदारसंघातील करमळी येथे एका परप्रांतीय बिल्डरकडून ८४ फ्लॅट्स, ४६ दुकाने आणि स्वीमिंग पूलांसह मेगा प्रकल्पाचे काम सुरू असून नगर नियोजन खात्याकडून अधिकारांचा गैरवापर करून या प्रकल्पाला मदत केली जात असल्याचा आरोप आमदार विरेश बोरकर यांनी केला. या प्रकल्पाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी आमदार बोरकर यांनी आज स्थानिकांसह मुख्य नगर नियोजकांची भेट घेतली.
करमळी पंचायतीजवळच हा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पासाठी फक्त साडेतीन मीटर रस्ता असूनही नियोजित रस्त्याच्या अंदाजाने परवाने दिल्याचे सांगितले जाते. याठिकाणी लोकांना केवळ एक तास पाणी मिळते, तर संपूर्ण मतदारसंघात ३.५ एमएलडी पाण्याची कमतरता आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प उभा राहिल्यास पाण्याची सोय कुठून करणार, असा सवाल आमदार बोरकर यांनी केला.
पूर्वीच्या ६० टक्के एफएआरची मर्यादा ओलांडून या प्रकल्पासाठी २०० टक्के एफएआर देण्यात आला असून नगर नियोजन खात्याने परप्रांतीय बिल्डरांसाठी गोव्याचे गाव आंदण ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकल्पाविरोधात आमदार विरेश बोरकर यांच्यासोबत पक्षाध्यक्ष मनोज परब, अजय खोलकर तसेच करमळी पंचायतीचे पंच एड. भूवनेश्वर फातर्फेकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

  • Related Posts

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    प्रखर आंदोलनाचा संघटनेचा इशारागांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) कदंब परिवहन महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. दिवसेंदिवस महामंडळ आपली जबाबदारी झटकून कर्मचाऱ्यांना खाजगी कंत्राटदार कंपन्यांच्या दाव्याला बांधत आहे. हा प्रकार अजिबात…

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    Panaji, March 21, 2026: St Andre MLA Viresh Borkar has submitted a Notice of Motion for Breach of Privilege under Rule 76 of the Goa Legislative Assembly, raising serious concerns…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 27 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 23 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 31 views
    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 7 views
    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 17 views
    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 14 views
    किती म्हणून सहन करणार ?