काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

चर्चा स्थगित ठेवण्याचा गोवा फॉरवर्डचा निर्णय

गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीची प्राथमिक चर्चा सुरू होऊन काही दिवसही उलटले नाहीत, तोच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने युतीची चर्चा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने सर्व ४० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी हाती घेण्याची घोषणा करून स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्रितपणे भाजपचा सामना करावा, अशी इच्छा बहुतांश गोमंतकीयांची आहे. हे ओळखून केवळ लोकांच्या दबावापोटी प्रमुख विरोधी पक्षांनी युतीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. काँग्रेस पक्षानेही प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली युतीची चर्चा करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. पहिल्या फेरीची बैठक विजय सरदेसाई आणि गिरीश चोडणकर यांच्यात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विरोधी आमदारांच्या बैठकीचे आमंत्रण दिले नाही. या विषयावरून विजय सरदेसाई बरेच खवळले आहेत.
युतीच्या चर्चेला स्थगिती
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत युतीबाबतच्या घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची कृती तसेच विविध मतदारसंघांतील युतीबाबतचा कानोसा पाहिल्यानंतर काँग्रेसबाबत लोकांच्या मनात अजूनही साशंकता आहे. दोन वेळा काँग्रेसचे आमदार भाजपात गेले असल्यामुळे ते हॅट्रिक तर करणार नाहीत ना, असा संशय लोकांना आहे, असे मत विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. तूर्त सर्व ४० मतदारसंघात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला जोर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

  • Related Posts

    ‘गोंय राखण यात्रे’ साठी काँग्रेस सज्ज

    प्रदेश समिती आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक गांवकारी,दि.४ (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घोषित केलेल्या गोंय राखण यात्रेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस सज्ज बनली आहे. काँग्रेस समिती आणि राज्य कार्यकारिणीच्या…

    AICC Constitutes Goa Alliance Committee for 2027 Assembly Elections

    In a significant move ahead of the 2027 Goa Assembly elections, the All India Congress Committee (AICC) has constituted a Goa Alliance Committee to coordinate with alliance partners in the state.

    You Missed

    05/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 6 views
    05/08/2026 e-paper

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 16 views
    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 27 views
    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 17 views
    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 20 views
    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions