धर्म, संस्कृतीचे रक्षण की कमिशन ?

भोमावासियांचा सरकारला सवाल

पणजी,दि.१६(प्रतिनिधी)

धर्म,संस्कृती रक्षणाच्या बाता मारणारे हे सरकार आता खरोखरच तसे वागते की कमिशनच्या लालसेने संस्कृती, परंपरेलाही लाथाडते हे पाहायचे आहे, असे म्हणून भोमवासियांनी आता राज्य सरकारलाच पेचात टाकले आहे. भोम गावातील देवस्थानांची विभागणी, रिती-रिवाज तथा सण, उत्सवांवर थेट परिणाम करणाऱ्या महामार्ग रूंदीकरणावर सरकार नेमके काय करते, हे पाहायचे आहे,असा पवित्रा भोमनासियांनी घेतला आहे.

भोम गांवच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला भोमकरांचा विरोध आहे. यासंबंधी बराच काळ आंदोलन सुरू असून भोमवासियांना अटकही झाली होती. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरिएटो फर्नांडिस यांच्यामार्फत केंद्रीय मंत्र्याकडे त्यांनी हा विषय पोहचवला असता गडकरी यांनी त्यांना तोडगा काढण्याचे आश्नासन दिले होते.
५५७ कोटी मंजूर
अलिकडेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी फोंडा ते भोमा रस्त्यासाठी ५५७ कोटी मंजूर केल्याची घोषणा केली आहे. भोमाच्या महामार्गाचा विषय लक्षात घेऊनच त्यांनी ही घोषणा केली असावी,असा विश्वास संजय नाईक यांनी व्यक्त केला आहे.

भोमाचा विषय हा केवळ महामार्ग रूंदीकरणाचा नाही. गांवचा वारसा, संस्कृती, मंदिरे, धार्मिक विधी आणि सण आदींचे जतन करण्यासाठी बायपास काढून हा विषय निकालात काढावा, ही मागणी सरकारने विचारात घेतली आहे,असे आम्ही समजतो,असेही ते म्हणाले.
भोमकरांच्या हाती महत्वाचे दस्तएवज
पुराभिलेख विभागाकडून काही महत्त्वाची कागदपत्रे भोमवासीयांना मिळाली आहेत. पोर्तुगीज दस्तऐवजांमध्ये ही जागा देवता आणि एक पारंपारिक तलाव असल्याची नोंद आहे. या जागेला ४०० वर्षांहून अधिक वर्षांच्या अस्तित्वाचा पुरावा असल्याने ते वाचवण्यासाठी पुरावा पुरेसा आहे. भोमवासीयांना कोर्टात जावे लागले तर या कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर लढाई लढली जाईल, असेही संजय नाईक म्हणाले.
सरकारवर अविश्वास
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोमा येथे रस्ता खांबांसह उंच केला जाईल तसेच भोमातील कोणत्याही मंदिराला बाधा पोहचवली जाणार नाही. फक्त चार घरे आणि रस्त्याच्या कडेला असलेली काही दुकाने प्रभावित होतील. मात्र, भोमकरांना याबाबत विश्वास नाही. या नियोजनामुळे भोमातील वारसा स्थळे, मंदिरे आणि चार नव्हे तर अनेक घरांचे नुकसान होऊ शकते. अनेक बांधकाम असेलल्या लोकांकडे मालकीची कागदपत्रे नसल्याने सरकार त्यांचा विचारच करत नसल्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

पंचायतीचा ग्रामस्थांना पाठींबा
भोमाचे सरपंच दामोदर नाईक यांनी म्हटले आहे की ग्रामपंचायतीने सर्व ठराव आणि हरकती सरकारकडे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे पाठवल्या आहेत. पंचायतीने आधीच आपला पाठींबा बायपासची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना दिला आहे.

  • Related Posts

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    टीकाकारांच्या तोंडाला कायदेशीर कुलुप पणजी,दि.२१(प्रतिनिधी)- सनबर्न महोत्सवाचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून स्थानिक धारगळ पंचायतीचा ना हरकत दाखला. पर्यटन खात्याची तत्वतः मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त…

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    खाते विश्वजीतांकडे, सेवावाढीची मेहरनजर मुख्यमंत्र्यांची पणजी,दि.२०(प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांच्या सेवावाढीला नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना जबाबदार धरले जाते. परंतु प्राप्त माहितीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 9 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 6 views
    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 8 views
    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 9 views
    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!