“फिश मील प्रकल्प, चले जाव!”

कुंकळ्ळी नगरपालिकेने अखेर परवाना नाकारला

गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी)

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत नवीन फिश मील प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही, असा एकमुखी ठराव नगरपालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अखेर नगरपालिका मंडळाला स्थानिकांच्या बाजूने उभे राहणे भाग पडले.
प्रदूषणामुळे कुंकळ्ळीवासीयांचा कोंडमारा
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत अनेक प्रदूषणकारी प्रकल्प कार्यरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आमदार युरी आलेमाव हे विधानसभेत सातत्याने हा विषय उपस्थित करून सरकारला धारेवर धरतात. मात्र, सरकारकडून कोणतेही ठोस सहकार्य मिळत नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली. आमदार आलेमाव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्र लिहून याबाबत लक्ष वेधले आहे.
आरोग्यावर परिणाम
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील विद्यमान फिश मील उत्पादन प्रकल्प आणि ॲफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांटमुळे प्रदूषण होत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. जलस्रोतांनाही धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पांविरोधात अनेक वर्षांपासून आंदोलन केले आहे.
बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात प्रदूषणामुळे श्वसनविकार, कर्करोग, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आणि सोरायसिससारख्या आजारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणात २८ लोक श्वसन समस्यांनी त्रस्त, २९ लोकांना त्वचेची ॲलर्जी, ११ लोकांना दमा, ८ लोकांना साइनस समस्या, १ व्यक्तीस दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, १ व्यक्तीस सोरायसिस, अनेकांना धुळीच्या ॲलर्जीमुळे डोळ्यांत जळजळ अशी माहिती आमदार युरी आलेमाव यांनी दिली.
आश्वासनाला हरताळ
मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अधिवेशनात फिश मील प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून नुकत्याच एका नव्या प्रकल्पाला परवानगी दिल्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता आणि शंका निर्माण झाल्या आहेत, अशी टीका आमदार आलेमाव यांनी केली. कुंकळ्ळी नगरपालिकेने परवाना नाकारून स्थानिकांच्या बाजूने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी नगरपालिकेचे अभिनंदन केले.

  • Related Posts

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Panaji: The Goa Pradesh Mahila Congress has extended support to victims and families affected by the alleged Curchorem sex scandal, raising serious concerns over institutional gaps and the lack of…

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ८०, ९२६ चौ. मीटर झोन बदलासाठी शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील ८०,९२६ चौ. मीटर…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 15 views
    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 15 views
    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 26 views
    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 23 views
    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 29 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 31 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…