गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुबं कल्याण मंत्रालयाकडून घोषणा

गांवकारी,दि.१४(प्रतिनिधी)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोव्याला नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० जागा मंजूर केल्या आहेत. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या या जागा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे दक्षिण गोव्यात नवे वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून गोव्यातील वैद्यकीय शिक्षणाची संधी पाहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानले आहेत. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर गोव्याला मिळालेली ही भेट असून, राज्यातील इच्छुक वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नव्या आशेचा किरण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ वाढवण्यास आणि आरोग्यसेवांना बळकटी देण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गोव्यात वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या या नव्या महाविद्यालयामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार आहे.
५० एमबीबीएस जागांचे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच स्थापन करण्यात यावे, अशी मागणी मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी केली. यासाठी रुग्णालयाचे आधुनिक सुविधा, विशेष वैद्यकीय विभाग आणि पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग असलेल्या पूर्णतः सुसज्ज टर्शयरी आरोग्य संस्थेत रूपांतर करणे आवश्यक आहे. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांसह संपूर्ण दक्षिण गोव्यातील रुग्णांना लाभ होईल, असे ते म्हणाले.

  • Related Posts

    प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक

    केंद्र सरकारने मंजुरी दिलेले ५० एमबीबीएस जागांचे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ‘मडगावचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळण्याबरोबरच दक्षिण गोव्यातील जनतेला प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकतील.

    मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

    बनावट अबकारी आयुक्त, कॅश फॉर जॉब आणि पर्वरी गोळीबार प्रकरणावरून सरकारवर गंभीर आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणांची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणात गैरव्यवहार आणि फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्यावरून निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

    You Missed

    14/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 16 views
    14/10/2026 e-paper

    आल्वारा जमिनी; आव्हान स्वीकारा !

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 9 views
    आल्वारा जमिनी; आव्हान स्वीकारा !

    गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 19 views
    गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय

    प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 19 views
    प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातच उभारा – प्रभव नायक

    मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 21 views
    मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

    Goa Protection of Agricultural Lands Act, 2026: Justice Ferdino Rebello’s Draft Bill Sets the Stage for a Major Debate Ahead of Assembly Elections

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 14, 2026
    • 19 views
    Goa Protection of Agricultural Lands Act, 2026: Justice Ferdino Rebello’s Draft Bill Sets the Stage for a Major Debate Ahead of Assembly Elections