गोमंतक हिंदू तेली समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात

गांवकारी, दि. १८

गोमंतक हिंदू तेली समाज आणि तेली ज्ञातीबांधव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलन ज्ञानदा सभागृह, हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था, हरमल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विविध उपक्रमांद्वारे सामाजिक एकोपा आणि बंधुत्वाचे दर्शन घडले.
कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री. मोहन डीचोलकर यांच्यासह इतर दिवंगत ज्ञातीबांधवांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर समाजाचे माजी अध्यक्ष श्री. केशव मठकर यांनी डीचोलकर यांच्या कार्यकर्तृत्वावर थोडक्यात प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
समाजाचे विद्यमान अध्यक्ष श्री. सत्यवान सातार्डेकर आणि सम्मेलनाध्यक्ष श्री. गंगाराम मठकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत समाज संघटित असण्याचे फायदे स्पष्ट केले.
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवृत्त अवर सचिव श्री. उदय डीचोलकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करून समाजाच्या विश्वासाला जागण्याचे आवाहन केले. उद्योजक आणि समाजातील मान्यवर श्री. विनोद शेलार यांनी विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायात यश मिळवण्यासाठी प्रेरणा दिली.
श्री. सूदन बर्वे यांनी समाजातील ज्येष्ठ विचारवंतांचे व कार्यकर्त्यांचे सामाजिक योगदान अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप विविध वयोगटांतील मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. नृत्य, गायन आणि नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून मुलांनी आपली कला सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

  • Related Posts

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोवा विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या, रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सांगे…

    ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ३० कोटींचा खर्च

    ८६ देशांतील १५४ चित्रपटांचे प्रदर्शन ————————————————— गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) : गोव्यात होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) राज्य सरकार सज्ज झाले असून, यंदाचा महोत्सव ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’…

    You Missed

    Congress Demands Immediate Arrests in Karapur-Sarvan Assault Case, Seeks CM Sawant’s Resignation

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 20, 2026
    • 9 views
    Congress Demands Immediate Arrests in Karapur-Sarvan Assault Case, Seeks CM Sawant’s Resignation

    Will CM Pramod Sawant Dare to Tell PM Modi ‘Bhivpachi Garaj Na’? Prabhav Naik Questions Goa Govt’s Lavish Spending

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 20, 2026
    • 12 views
    Will CM Pramod Sawant Dare to Tell PM Modi ‘Bhivpachi Garaj Na’? Prabhav Naik Questions Goa Govt’s Lavish Spending

    Padma Shri Awardee Norma Alvares Features Among India’s Most Influential Women Lawyers

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 19, 2026
    • 10 views
    Padma Shri Awardee Norma Alvares Features Among India’s Most Influential Women Lawyers

    Goa’s Land Destruction is State-Sponsored, Alleges Former Chief Justice Ferdino Rebello

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 19, 2026
    • 6 views
    Goa’s Land Destruction is State-Sponsored, Alleges Former Chief Justice Ferdino Rebello

    Three Cops from Same Family Transferred to South Goa; Political Interference Alleged

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 17, 2026
    • 13 views
    Three Cops from Same Family Transferred to South Goa; Political Interference Alleged

    जलस्मार्ट की पाणीटंचाईचे राज्य?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 16, 2026
    • 13 views
    जलस्मार्ट की पाणीटंचाईचे राज्य?