इंडेक्स फंड्स : आजची योग्य निवड, उद्याचा मजबूत पाया

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. महागाई, खर्चवाढ आणि अनिश्चित भविष्य यामध्ये बचतीबरोबरच गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. गुंतवणूक ही फक्त श्रीमंतांची गरज नसून, प्रत्येक सामान्य कुटुंबाचीही जबाबदारी आहे.
गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत – सोने, बॉण्ड्स, शेअर्स, वेळप्रसंगी जोखीमयुक्त भविष्य आणि पर्याय मार्केट (कॉल/पूट) आणि म्युच्युअल फंड्स. मात्र, या सर्व पर्यायांमध्ये जोखीम, खर्च आणि व्यवस्थापनाचा त्रास असतो. यामध्ये सर्वात सोपा, पारदर्शक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असलेला पर्याय म्हणजे इंडेक्स फंड्स. हे फंड्स नीफ्टी ५० , नीफ्टी नेक्स्ट ५० सारख्या प्रमुख निर्देशांकांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्याचाच परफॉर्मन्स परताव्यात दिसून येतो. इतरही अनेक निर्देशांकांमध्ये इंडेक्स फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. तथापि, एक चांगली सुरुवात आणि मजबूत पायाभरणी या दृष्टिकोनातून नीफ्टी ५० व नीफ्टी नेक्स्ट ५० हे वैविध्यपूर्ण पर्याय उत्तम ठरतात.
नीफ्टी ५० च्या ग्राफवर नजर टाकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. अल्पकालीन चढ-उतार भरपूर असले तरी दीर्घकालीन चार्ट सतत वर चढताना दिसतो. यामधून एक महत्त्वाचा धडा मिळतो: गुंतवणूक जितक्या लवकर सुरू कराल, तितका “कंपाऊंडिंगचा जादूई फायदा” तुमच्यासाठी काम करेल. वीस वर्षांचा तरुण/तरुणी जर आज गुंतवणुकीला सुरुवात करत असेल आणि निवृत्तीपर्यंत थांबून राहण्याची तयारी असेल, तर मधल्या चढ-उतारांकडे न पाहता स्थिर आणि मोठी संपत्ती निर्माण नक्कीच करता येईल. छोट्या रकमेची पण वारंवार (अगदी दररोजसुद्धा) गुंतवणूक मार्केटमधील दर चढउताराचा फायदा देऊ शकते.
बर्‍याच लोकांना वाटते की म्युच्युअल फंड्स किंवा इंडेक्स फंड्स खरेदी करण्यासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक आहे. पण हा एक गैरसमज आहे. तुम्ही एएमसी (एसेट मॅनेजमेंट कंपनी) च्या वेबसाईट्स/ॲप्सवर थेट गुंतवणूक करू शकता. तसेच फोन पे किंवा एमएफ सेंट्रल (सद्यस्थितीत) सारख्या ॲप्सवरून सहज व्यवहार करता येतात. म्हणजेच, इंडेक्स फंड्स विकत घेता येतात आणि विकता (रिडीम करता) येतात. या व्यवहारात कुठलाही क्लिष्टपणा नाही आणि तुम्ही अगदी थोड्या रकमेपासून (उदा. वन टाईम एकत्रित शंभर रूपये ) सुरुवात करू शकता. महत्वाचे म्हणजे, आपल्या खिशातील स्मार्टफोनवरून हे व्यवहार अतिशय सोपे झाले आहेत.
इंडेक्स फंड्सचा संदेश अगदी साधा आहे: जागतिक आणि स्वदेशी बाजारात नेहमीच अनिश्चितता असते, पण दीर्घकालीन गुंतवणुकीत शिस्त, संयम आणि सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते.

लेखक परिचय
श्री. सचिन वसंत पाध्ये हे २०२० पासून गोव्यात वृत्तपत्रांद्वारे, कॉलेज लेक्चर्स, टीव्ही व पॉडकास्ट या माध्यमांतून इंडेक्स फंड जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. लवकरच गणेश चतुर्थीला त्यांचा “गणपती व इंडेक्स फंड (मार्केट)” यातील साधर्म्य दाखवणारा लेख प्रसिद्ध होणार आहे. नुकतीच त्यांनी गोव्यातील कॉलेजेस व पंचायत स्तरावर एक आठवड्याची व्याख्यानमाला यशस्वीरीत्या पूर्ण केली. इंडेक्स फंडचे जनक जॅक बोगल यांच्या विचारसंपदेने प्रभावित होऊन भविष्यात श्री. पाध्ये सोपे आणि संदर्भयुक्त भाषांतर या संकल्पनेवर आधारित स्वतःचे पुस्तक लिहिण्याच्या तयारीत आहेत.

-श्री. सचिन वसंत पाध्ये

  • Related Posts

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    २ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री आठवतात. पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते — राजाराम रंगाजी पैंगिणकर. आज त्यांची जयंती नाही किंवा पुण्यतिथीही नाही.…

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर…

    You Missed

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 13 views
    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 25 views
    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 16 views
    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    02/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 21 views
    02/10/2026 e-paper

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 25 views
    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 28 views
    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर