गोव्यातील विद्यार्थी आंदोलनाला बळी पडले नाहीत : मुख्यमंत्री सावंत

गांवकारी,दि.१(प्रतिनिधी)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, नीट परीक्षेसंदर्भात गोव्यात झालेल्या आंदोलनात परप्रांतीयांनी गोव्याच्या विद्यार्थी व पालकांना गुंतविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यातील हुशार विद्यार्थी या नादाला बळी पडले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या व्हिडिओनंतर मुख्यमंत्री सावंत यांनीही आपला व्हिडिओ प्रसिद्ध करून जनरेशन-झेडशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आमची पिढी सुसंस्कृत व सुशिक्षित असल्यामुळे अशा प्रवृत्तीला बळी पडणार नाही.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व युवक-युवतींना देश उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात पंतप्रधानांविषयी असभ्य व अभद्र भाषेचा वापर करण्यात आला. एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वर्गीय मातेसंबंधीही अपमानास्पद शब्द वापरले गेले.
ही वृत्ती सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही, असे सांगत मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, यात तरुणांची चूक नाही. ते अज्ञानामुळे असे वर्तन करतात. त्यामुळे शिक्षक व पालकांनी त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या काळजाने आणि मनाने या विद्यार्थ्यांना माफ केले आहे. ते या विद्यार्थ्यांच्या विरोधात कुठेच तक्रार करणार नाहीत,असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

  • Related Posts

    गिरीश- विजय यांची युतीसाठी बैठक

    भाजपविरोधी एकजुटीवर चर्चा प्रारंभ गांवकारी,दि. १ (प्रतिनिधी) आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीच्या दिशेने महत्त्वाची पाऊले पडू लागली आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि…

    Faulty E-Challan POS Devices Stall Enforcement, Citizen Urges Goa Transport Department to Restore Physical Checking Report Books

    Porvorim, August 1: RTI activist Sudip Narayan Tamankar has urged the Goa Transport Department to immediately reintroduce physical Checking Report (CR) books for Motor Vehicle Inspectors (MVIs) and Assistant Motor Vehicle Inspectors (AMVIs), alleging that faulty handheld Point of Sale (POS) e-challan machines have severely hampered traffic enforcement for the past several months.

    You Missed

    01/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 15 views
    01/08/2026 e-paper

    गोव्यातील विद्यार्थी आंदोलनाला बळी पडले नाहीत : मुख्यमंत्री सावंत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 18 views
    गोव्यातील विद्यार्थी आंदोलनाला बळी पडले नाहीत : मुख्यमंत्री सावंत

    जेन झीला ‘असभ्य’ ठरविण्याचा प्रयत्न?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 22 views
    जेन झीला ‘असभ्य’ ठरविण्याचा प्रयत्न?

    गिरीश- विजय यांची युतीसाठी बैठक

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 13 views
    गिरीश- विजय यांची युतीसाठी बैठक

    Faulty E-Challan POS Devices Stall Enforcement, Citizen Urges Goa Transport Department to Restore Physical Checking Report Books

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 18 views
    Faulty E-Challan POS Devices Stall Enforcement, Citizen Urges Goa Transport Department to Restore Physical Checking Report Books

    Private Bus Operators Seek 10,490 sq. m. Land at Patto for Dedicated Parking Facility

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 1, 2026
    • 20 views
    Private Bus Operators Seek 10,490 sq. m. Land at Patto for Dedicated Parking Facility