कारापूरवासियांची पंचायतीवर धडक

ठरावांची पूर्तता करण्याची जोरदार मागणी


गांवकारी, दि.२५ (प्रतिनिधी)

कारापूर-सर्वणच्या ग्रामसभेत नियोजित लोढा प्रकल्पाला दिलेले परवाने मागे घेण्यासंबंधी मंजूर झालेल्या ठरावांची तात्काळ पूर्तता करावी, अशी मागणी करून कारापूरवासियांनी आज पंचायतीवर धडक दिली. या ठरावांची पूर्तता कधी करणार हे सरपंचांनी लोकांसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी करून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले.
कारापूर-सर्वण पंचायत मंडळाची आज बैठक होती. या बैठकीसाठी आंदोलकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठराव पंचायत मंडळाच्या बैठकीत समंत करण्यात आले. ठराव समंत झाल्यानंतर त्याची प्रत देण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. यावेळी सरपंच आणि सचिवांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न झाला. ग्रामस्थांनी हे ठराव कधी कार्यान्वित करणार, असा सवाल करून ठरावांची प्रत हवी, अशी मागणी केली असता ती पुढील आठवड्यात देऊ, असे सांगण्यात आले.
ग्रामस्थांसमोरच ठराव पूर्ततेचे वचन द्या
ग्रामस्थांनी थेट पंचायतीवर मोर्चा काढून सरपंच किंवा सचिवांनी ग्रामस्थांसमोरच ठरावांच्या पूर्ततेचे वचन द्यावे, अशी मागणी केली. ग्रामसभेत जरी सर्व पंचसदस्यांनी लोढा विरोधी आंदोलनाला पाठींबा दिला असला तरी अजूनही ही पंचमंडळी उघडपणे पुढे येत नाहीत. केवळ वेळ मारून नेण्यासाठी आंदोलनाला पाठींबा दर्शवून काहीच उपयोग नाही. कारापूर-सर्वण गावच्या रक्षणार्थ पंचमंडळींनी पुढे यायला हवे, अशी मागणीही लोकांनी केली. यावेळी महिलावर्ग बराच आक्रमक झाला. आज आंदोलनाला २१ दिवस पूर्ण झाल्यामुळे पंचायतीने ठरावांची पूर्तता करून ग्रामस्थांच्या मागणीची कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
पोलिस निरीक्षक दाखल
आंदोलकांनी थेट पंचायतीवर धडक दिल्यानंतर तिथे ताबडतोब पोलिस दाखल झाले. यावेळी वातावरण बरेच तापले होते. डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे स्वतः हजर झाले. सरपंचांनी पोलिस निरीक्षकांच्या संरक्षणात ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देत पुढील आठवड्यात ठरावांची प्रत स्थानिकांना देण्याचे मान्य केले.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 17 views
    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 14 views
    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 16 views
    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 16, 2026
    • 17 views
    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 18 views
    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 15, 2026
    • 22 views
    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???