कोडलीतील खाणकामाच्या त्वरीत चौकशीची मागणी

ओपा जलप्रकल्पालाही संभाव्य धोका

गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
सांगे तालुक्यातील कोडली येथे खांडेपार- दुधसागर नदीच्या पात्रापासून अवघ्या १५ ते २० मीटर अंतरावर मोठे पाण्याने भरलेले खाण खंदक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या खंदकांमुळे नदीचे पर्यावरण, भूजलसाठे तसेच ओपा जलपुरवठा प्रकल्पाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

खांडेपार येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेट पारकर यांनी संबंधित सरकारी यंत्रणांकडे लेखी तक्रार दाखल करून या खाण खंदकांतील खनिज उत्खननाला पर्यावरणीय मंजुरी देण्यास आक्षेप घेतला आहे. नदीलगतच्या प्रतिबंधित क्षेत्रात खाणकामाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

खाण खंदकांची खोली आणि व्याप्ती मंजूर खाण आराखड्यापेक्षा अधिक असल्याची शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. या खंदकांमुळे पाण्याचा झिरपा, भूजलपातळीत बदल, नदीपात्रात गाळ साचणे आणि पर्यावरणीय हानी होण्याचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः नदीकाठच्या परिसरात भूस्खलन झाल्यास नदीचे पाणी खाण खंदकात शिरून पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचा फटका नदीच्या खालच्या भागातील गावांसह ओपा जलपुरवठा प्रकल्पाला बसण्याची भीती तक्रारदाराने व्यक्त केली आहे. तसेच मंदिराजवळील खोल खाण खंदकांना संरक्षक कुंपण नसल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणी खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालय, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वन खात्याने संयुक्त स्थळपाहणी करावी, नदीपासून खंदकांपर्यंत प्रत्यक्ष अंतर मोजावे आणि पर्यावरणीय मंजुरीच्या अटींची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास खाणकाम तातडीने बंद करून खंदकांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्वसन करावे, तसेच १५ दिवसांत कारवाई करावी, अशी मागणी पारकर यांनी केली आहे.

  • Related Posts

    मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

    कोपनहेगन ओपन स्क्वॉश स्पर्धेत यश फडतेला विजेतेपद; ऑलिंपिकच्या स्वप्नासाठी सरकारी मदतीची प्रतीक्षाच गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धांमध्ये गोव्यासह भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या यश फडतेच्या वाट्याला मैदानात यश, तर…

    दोन लाख महिला तीन हजारांच्या प्रतीक्षेत !

    आमदार विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल गांवकारी,दि.२४(प्रतिनिधी) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या नावाखाली भाजप सरकार मोठमोठ्या घोषणा आणि प्रसिद्धी करत असले तरी प्रत्यक्ष लाभ देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे…

    You Missed

    ₹16-Crore Janjati Gaurav Celebrations Under Scanner; Congress Alleges Massive Irregularities

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 28, 2026
    • 12 views
    ₹16-Crore Janjati Gaurav Celebrations Under Scanner; Congress Alleges Massive Irregularities

    28/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 28, 2026
    • 20 views
    28/10/2026 e-paper

    विरोधकांनो, आघाडीचा निर्णय तातडीने घ्या!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 28, 2026
    • 24 views
    विरोधकांनो, आघाडीचा निर्णय तातडीने घ्या!

    सत्तेचा अहंकार आणि विरोधकांची अगतिकता !

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 28, 2026
    • 17 views
    सत्तेचा अहंकार आणि विरोधकांची अगतिकता !

    कोडलीतील खाणकामाच्या त्वरीत चौकशीची मागणी

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 28, 2026
    • 12 views
    कोडलीतील खाणकामाच्या त्वरीत चौकशीची मागणी

    Mahadayi Dispute: Goa, Karnataka and Maharashtra Groups Call for Dialogue, Transparency and Ecological Protection

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 28, 2026
    • 21 views
    Mahadayi Dispute: Goa, Karnataka and Maharashtra Groups Call for Dialogue, Transparency and Ecological Protection