मडकईकरांच्या बॉम्बगोळ्याने भाजप हादरला

विरोधकांकडून चौकशीची मागणी, सरकारची अब्रु वेशीवर

पणजी,दि.५(प्रतिनिधी)-

कुंभारजुवेचे माजी आमदार आणि माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी केलेल्या सनसनाटी विधानामुळे भाजपच्या तंबूत अस्वस्थता पसरली आहे. सरकारातील बहुतेक मंत्री पैसे करण्यात व्यस्त आहेत, आपण एका कामासाठी २० लाख रूपये मोजल्याचे विधान करून त्यांनी सरकारची बेअब्रू केल्याने पक्षाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली आहे. पक्षातील काही मुळ कार्यकर्ते मात्र या विधानामुळे बरेच खूश असून कुणीतरी हे उघडपणे बोलण्याचे धाडस केले,असे ते खाजगीत बोलत आहेत.
मडकईकर पोहचलेच कसे?
सध्याच्या परिस्थितीत राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असलेले माजीमंत्री पांडुरंग मडकईकर हे अचानकपणे बाहेर पडून थेट बी.एल.संतोष यांना भेट देतात. भेट दिल्यानंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना आपल्याच सरकारच्या विरोधात गंभीर आरोप करतात, हे नेमके घडलेच कसे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सरकारातील काही मंत्र्यांतर्गत सध्या धुसफुस सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर एकमेकांविरोधात तक्रारी पोहचवण्यासाठीही स्पर्धा सुरू आहे,अशीही माहिती प्राप्त झाली आहे. बी.एल.संतोष यांच्या गोवा भेटीची संधी साधून मडकईकरांमार्फत सरकारची धिंड काढण्याची ही योजना पक्षातीलच काही लोकांनी आखली असण्याची शक्यता काही नेते व्यक्त करत आहेत. पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या विधानाबाबत मात्र कुणीही छातीठोकपणे हे विधान खोटे आहे,असे म्हणणार नाही, असेही आता काही कार्यकर्ते आणि नेते म्हणू लागले आहेत.
मॉविन गुदीन्हो म्हणतात नाव घ्या
पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी पांडुरंग मडकईकर यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. मडकईकर हे माजीमंत्री आहेत. कुणावरही आरोप करताना त्यांनी नाव घेऊन तो आरोप करावा. त्यांच्या विधानामुळे सगळ्याच मंत्र्यांवर संशयाची सुई उभी झाली आहे. त्यांनी कुणाला पैसे दिले हे त्यांनी स्पष्ट करावे,असे गुदीन्हो म्हणाले.
मडकईकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी
माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी आम आदमी पार्टीचे समन्वयक एड.अमित पालेकर यांनी केली. पक्षाचे एक माजीमंत्री उघडपणे आपण पैसे दिल्याचे विधान करतात तर मग त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पक्षाच्याच नेत्याने पक्षातील भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याने बरे झाले अन्यथा विरोधकांनी हेच आरोप केले असते तर ते राजकारण करतात असे म्हणून पळ काढता आला असता,असा टोलाही एड.पालेकर यांनी हाणला.
भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता- सरदेसाई
भाजप सरकारने भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यताच दिलेली आहे. आपण याबाबत वेळोवेळी विधानसभेत बोललो आहे. पांडुरंग मडकईकर हे माजीमंत्री आहेत. त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केल्यामुळे त्याची स्वेच्छा दखल पोलिस, दक्षता खात्याने घेऊन चौकशी करावी अन्यथा ते बोलले हे तंतोतंत खरे आहे,असाच अर्थ त्यातून निघणार असा टोला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी हाणला.

मुख्यमंत्री गप्प का?
पक्षाचे एक नेता आणि माजीमंत्री सरकारी मंत्र्यांवर गंभीर आरोप करतात आणि त्याबाबत सरकारात आणि पक्षात इतकी शांतता हे काय दर्शवते,असा सवाल काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला. बी.एल.संतोष यांच्यापुढे हा विषय ठेवला जातो. मुख्यमंत्रीही अद्याप चकार शब्द काढत नाहीत, यावरून भ्रष्टाचार हा भाजपात किती भीनला आहे, हेच कळते. या आरोपांची सखोल चौकशी व्हायलाच हवी,असेही चोडणकर म्हणाले.

भाजप भ्रष्टाचारात आकंठ बुडाली
भाजप सरकार हे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. हे आता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच जाहीर केले आहे. मडकईकर यांनी या मंत्र्यांचे नाव उघड करावे जेणेकरून त्याबाबत कारवाई केली जाईल. सरकारने पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या आरोपांबाबत गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी केली.

  • Related Posts

    ‘नंदादीप’ मुख्यालयाचा लिलाव पुकारा

    ८५ कोटी रुपयांची देणी अजूनही थकित पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): म्हापसा अर्बन सहकारी बँकेचे मुख्यालय असलेल्या ‘नंदादीप’ इमारतीला २५ कोटी रुपयांना विकत घेण्याचा एकतर्फी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हापशातील…

    गोव्याची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा डाव

    हायकोर्टाच्या निवाड्याने जनतेच्या हक्कांना संरक्षण म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) – नगर नियोजन खात्याच्या कलम १७(२) अंतर्गत जमिनींची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा घाट अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उधळून लावला…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    ‘नंदादीप’ मुख्यालयाचा लिलाव पुकारा

    • By Gaonkaari
    • मार्च 17, 2025
    • 8 views
    ‘नंदादीप’ मुख्यालयाचा लिलाव पुकारा

    सलाम ! संतोबाराव सिंघमना

    • By Gaonkaari
    • मार्च 17, 2025
    • 8 views
    सलाम ! संतोबाराव सिंघमना

    17/03/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 17, 2025
    • 9 views
    17/03/2025 e-paper

    मन माझ्यात तू ठेव !

    • By Gaonkaari
    • मार्च 17, 2025
    • 10 views
    मन माझ्यात तू ठेव !
    error: Content is protected !!