न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

मडगांवात २२ तर म्हापशात २३ रोजी संवाद

गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी)

गोव्याची जमीन, पर्यावरण, शेती आणि नियोजनाशी संबंधित विविध प्रश्नांवर जनसहभाग अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘इनफ इज इनफ’ गोवा चळवळीचे निमंत्रक तथा निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो उत्तर आणि दक्षिण गोव्यातील स्वयंसेवी संस्था आणि युवकांशी संवाद साधणार आहेत. या अंतर्गत मडगाव आणि म्हापसा येथे दोन स्वतंत्र संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण गोव्यातील स्वयंसेवी संस्था आणि युवकांसाठी मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मडगाव येथील ग्रेस चर्च हॉलमध्ये पहिले सत्र होणार आहे. त्यानंतर उत्तर गोव्यासाठी बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत म्हापसा येथील कोमुनिदाद हॉलमध्ये संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे.

‘इनफ इज इनफ’ ही न्या. रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत नागरिक चळवळ असून गोव्याची जमीन, डोंगर, नद्या आणि शेतजमिनींचे संरक्षण तसेच शाश्वत विकासासंबंधी विविध मुद्दे या चळवळीने सातत्याने उपस्थित केले आहेत. चळवळीने यापूर्वी आपल्या दहा कलमी मागण्यांच्या सनदेच्या माध्यमातून जमीन आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर सरकारकडे मागण्या मांडल्या आहेत.
चळवळीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर, सरचिटणीस देविदास आमोणकर तथा प्रवक्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

  • Related Posts

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    राहूल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांची उपस्थिती गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बहुचर्चित ‘गोंय राखण यात्रा’ २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून १८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. २७ दिवसांच्या या…

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Indian squash player Yash Fadte reached the quarterfinals of the PSA Aramis Club Open in Belgium, demonstrating resilience in a grueling five-game battle against Scottish No. 1 John Meehan, following a remarkable comeback victory in the pre-quarterfinals.

    You Missed

    21/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 21, 2026
    • 11 views
    21/09/2026 e-paper

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 21, 2026
    • 11 views
    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 21, 2026
    • 16 views
    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 21, 2026
    • 21 views
    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 14 views
    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 11 views
    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला