रामाचा जबाब निर्णायक ?

जेनिटो जरी या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असला, तरी रामाचा काटा काढण्यासाठी फाईल दिलेला मास्टरमाईंड जोपर्यंत उजेडात येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझो याने हा हल्ला आपणच घडवून आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. उर्वरित सात आरोपींनी हा हल्ला जेनिटोच्या सांगण्यावरून केल्याचे या कबुलीजबाबातून समोर आले आहे. जेनिटो कार्दोझो हा गोव्याच्या गुन्हेगारी विश्वातील एक प्रमुख मोहरा आहे. अशा व्यक्तीला रामा काणकोणकर यांच्याशी वैयक्तिक वैर का असावे, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. जेनिटोकडून वेगवेगळ्या फाईल्स घेतल्या जातात. रामा काणकोणकर याची फाईल त्याला कुणीतरी दिली असावी आणि त्यातूनच हा हल्ला घडवून आणला गेला असावा, अशी शक्यता आहे. त्यामुळे जेनिटो जरी या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असला, तरी रामाचा काटा काढण्यासाठी फाईल दिलेला खरा मास्टरमाईंड जोपर्यंत उजेडात येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. सर्व आरोपींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र रामा काणकोणकर याची जबानी अद्यापही प्रलंबित आहे. पोलिसांनी ही जबानी नोंदवण्यासाठी न्यायदंडाधिकाना त्याच्याकडे पाठवले होते, पण त्याने जबानी दिली नाही, अशी माहिती एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. रामा काणकोणकर याची भेट घेऊन आलेले सामाजिक कार्यकर्ते संजीव नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अजूनही हल्ल्याच्या दहशतीखाली आहेत. त्यांची स्मृती अद्याप स्थिर झालेली नाही आणि अशा अवस्थेत जबानी नोंदवणे अयोग्य ठरेल. संजीव नाईक हे सांगत असतानाच काही सामाजिक कार्यकर्ते आणि नेते रामा काणकोणकर याची भेट घेऊन सोशल मीडियावर आपले फोटो व्हायरल करत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर रामा काणकोणकर हे थेट संवाद साधत असल्याचा आभास निर्माण होतो. यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची भेट घेणाऱ्यांनी फोटोसेशन टाळणे तपासाच्या दृष्टीने योग्य ठरेल. मुळात रामा काणकोणकर याच्या जबाबानंतरच या तपासाला योग्य दिशा मिळू शकते. या हल्ल्यामागे काहीतरी ठोस कारण किंवा प्रकरण असावे, ज्यामुळे त्याला आपल्या जिवाला धोका असल्याची जाणीव झाली असावी. एकीकडे त्याची जबानी नोंदवलेली नाही, तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारमधील एका मंत्र्यावर या प्रकरणी मास्टरमाईंड असल्याचा उघड आरोप करण्यात आला आहे. रामा काणकोणकर याने तसे सूचित केले असते किंवा पोलिसांना सांगितले असते, तर तो आरोप एकवेळ मान्य होऊ शकला असता. मात्र विरोधकांनी उघडपणे आरोप करणे कितपत योग्य आहे, हा सवाल उपस्थित होतो. जेनिटो कार्दोझो याचे सरकारमधील एका मंत्र्याशी जवळचे संबंध आहेत, किंबहुना जेनिटो हा त्याचा कामगारच आहे, असेही म्हटले जाते. या मंत्र्याशी संबंधित विषयावरूनच रामा काणकोणकर याला जेनिटोच्या मदतीने लक्ष्य करण्यात आले नसावे कशावरून, अशीही शक्यता आहे. या सर्व गोष्टी तपासात आणि न्यायालयात सिद्ध झाल्यानंतरच रामा काणकोणकर याला न्याय मिळू शकतो. फक्त वाऱ्यावर बोलल्या जाणाऱ्या किंवा कुजबुजल्या जाणाऱ्या गोष्टींनी काहीही उपयोग होणार नाही. आम आदमी पार्टीचे राज्य निमंत्रक एड. अमित पालेकर यांनी जेनिटो कार्दोझो याच्यासाठी आपले व्यावसायिक योगदान दिले होते. अनेक राजकीय गुन्हेगारांची वकिली एड. पालेकर यांनी यशस्वीरित्या केली आहे. फौजदारी खटल्यांमध्ये ते निपूण असल्यामुळे, रामा काणकोणकर प्रकरणात त्यांनी आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावण्याचे ठरवले आणि खऱ्या मास्टरमाईंडचा पर्दाफाश केला, तर “प्रोफेशनल माणसे राजकारणात हवीत” या युक्तीवादाला पुष्टी मिळेल. तसेच त्यांचे व्यावसायिक कसब त्यांच्या राजकीय पक्षालाही उभारी देऊ शकेल. एड. अमित पालेकर हे आव्हान स्वीकारतील का?

  • Related Posts

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    ठिकाणी खाजगी मेडिकल कॉलेज स्थापन करण्यापेक्षा एम्ससारखी सरकारी संस्था उभी राहिली तर त्यातून आरोग्याच्या बाबतीत राज्याला मोठा आधार मिळेलच, परंतु त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय आणि स्थानिकांना अनेक रोजगारसंधीही उपलब्ध होतील. गोवा…

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    अपक्ष उमेदवारांचा कितीही भरणा असला तरी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर विरोधकांचा फक्त एक उमेदवार भाजपच्या विरोधात उभा राहिला, तर भाजपचा आत्मविश्वास कोलमडून पडेल आणि जनतेचा विश्वास ओसंडून वाहील. निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन…

    You Missed

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 8 views
    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 15 views
    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 22 views
    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 27 views
    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 5, 2026
    • 29 views
    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 5, 2026
    • 20 views
    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल