रोहीतच्या बंगल्याची चौकशी करा !

दक्षता खात्याचे विविध विभागांना निर्देश

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांचे उल्लंघन करून ताळगांव कोमुनिदादच्या शेतजमिनीत, सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून, सर्वे क्रमांक १८६/३ या जागेत पणजीचे महापौर रोहीत मोन्सेरात यांनी सुरू ठेवलेल्या बंगल्याच्या बांधकामाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दक्षता खात्याने दिले आहेत.
ताळगांव कोमुनिदादचे गांवकार विटो गोम्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत दक्षता खात्याने विविध सरकारी विभागांना चौकशीचे आदेश दिले आहेत. गोम्स यांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शविल्यामुळे, दक्षता खात्याने तातडीने कारवाई करत संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गटविकास अधिकारी तसेच पंचायत खात्याला या बांधकामासंबंधी चौकशी करून, मिळवलेल्या विविध परवान्यांची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विटो गोम्स यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार मिळवलेल्या माहितीत असे स्पष्ट झाले आहे की, या बांधकामासाठी आवश्यक सनद प्राप्त न करता काम सुरू करण्यात आले आहे. रोहीत मोन्सेरात यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सनदसाठी अर्ज दाखल केला आहे.
राज्याचे महसूलमंत्री हे रोहीत मोन्सेरात यांचे वडील असल्यामुळे, या प्रकरणात पदाचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप गोम्स यांनी केला आहे.
ग्रेटर पणजी पीडीएत सेटलमेंटचा वाद
ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्ष असताना बाबुश मोन्सेरात यांनी आपल्या पुत्राच्या भूखंडाला सेटलमेंट झोनचा दर्जा मिळवून दिला होता. सभोवताली कोमुनिदादची शेती असताना, केवळ एकाच भूखंडाला सेटलमेंट झोनचा दर्जा कसा मिळू शकतो, असा सवाल विटो गोम्स यांनी उपस्थित केला आहे.
महसूल अधिकाऱ्यांनीच या प्रकरणात कारवाई करणे अपेक्षित असताना, संबंधित मंत्रीच रोहीत मोन्सेरात यांचे वडील असल्यामुळे कायद्याची थट्टा सुरू असल्याची तीव्र टीका गोम्स यांनी केली आहे.

  • Related Posts

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    चर्चा स्थगित ठेवण्याचा गोवा फॉरवर्डचा निर्णय गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीची प्राथमिक चर्चा सुरू होऊन काही दिवसही उलटले नाहीत, तोच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने युतीची…

    ‘गोंय राखण यात्रे’ साठी काँग्रेस सज्ज

    प्रदेश समिती आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक गांवकारी,दि.४ (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घोषित केलेल्या गोंय राखण यात्रेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस सज्ज बनली आहे. काँग्रेस समिती आणि राज्य कार्यकारिणीच्या…

    You Missed

    05/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 7 views
    05/08/2026 e-paper

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 16 views
    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 27 views
    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 20 views
    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions