सरदेसाईंना ”सावंतां”चे वावडे !

एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवून सत्तेपर्यंत चढण्यासाठीच ही युती असेल, तर मग जनतेला सावध राहावे लागेल.

हल्लीच गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केलेले मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच एड. अमित सावंत यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे चिन्ह स्वीकारार्ह ठरेल, या उद्देशाने काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय गोवा फॉरवर्डच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. वास्तविक काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी हे जिल्हा पंचायतीसाठी एकत्र आले असल्याचे चित्र तयार झाले असताना या विषयावरून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये सुरू झालेला हा कलगीतुरा जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा ठरला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कळंगुटकर यांनी एक व्हिडिओ जारी करून एड. अमित सावंत यांना पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली. एड. सावंत यांच्याविरोधात स्थानिक पातळीवर ते जमीन व्यवहारांत गुंतल्याचे तसेच त्यांचा भूमाफियांशी संबंध आणि भूरूपांतरात सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढ्या गंभीर आरोपांबाबत कळंगुटकर यांच्याकडे पुरावे न मागता सर्व प्रमुख मीडियाने या आरोपांना दिलेली प्रसिद्धी हा देखील आश्चर्याचा भाग म्हणावा लागेल.
मांद्रे मतदारसंघ काँग्रेस गट समितीने एड. सावंत यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतरच प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी त्याला मंजुरी दिली. सावंत यांच्या पक्षप्रवेशाला अडथळा निर्माण करण्याच्या हेतूने निलंबन करून त्यांच्यावर गंभीर आरोपांचा डाव गोवा फॉरवर्डने खेळला. एवढे करूनही सावंत दांपत्याचा प्रवेश म्हापशातील जिल्हा कार्यालयात झाला, हे पाहून गोवा फॉरवर्ड पक्ष चवताळला.
काँग्रेस प्रवेशाच्या या विषयावरून गोवा फॉरवर्डच्या नेत्यांकडून काँग्रेस श्रेष्ठी आणि पक्षाच्या आमदारांकडून एड. सावंत यांच्या पक्षप्रवेशाला हरकत घेतल्याचे वृत्त पाहिल्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांचे काँग्रेसमधील राजकीय वजन उघड झाले. अगदी माणिकराव ठाकरे आणि तिन्ही आमदारांनी सावंत यांच्या प्रवेशाला हरकत घेतल्याच्या बातम्याही झळकल्या. या एकूणच डावपेचात अमित पाटकर यांच्या नेतृत्वाला कमी लेखण्याची पद्धतशीर खेळी खेळण्यात आली.
अमित पाटकर यांचे मुख्यमंत्री सावंत यांच्याशी साटेलोटे आहेत, असा प्रचार काँग्रेसमधीलच त्यांचा शत्रू गट आणि सहकारी म्हणवणारे शत्रू पक्ष करत आहेत. एड. सावंत यांच्यामुळे पाटकरांचे सावंतप्रेम उघड झाले, असा टोला सरदेसाई यांनी हाणून ते स्पष्ट केले. वास्तविक अमित पाटकर आणि त्यांच्या समर्थकांचा विजय सरदेसाई यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या प्रस्तावाला विरोध आहे, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. त्यामुळेच सरदेसाई यांच्या पुढाकारातून काँग्रेसमधील सरदेसाई समर्थक गटाकडून पाटकर यांना हटविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची वार्ता पसरली होती. आता त्यानिमित्ताने पुन्हा एकदा या चर्चेला जोर मिळाला आहे.
एखाद्या आमदाराच्या पक्षप्रवेशासाठीही इतकी धडपड किंवा रस्सीखेच होत नाही, तिथे एड. सावंत यांच्या प्रवेशावरून एवढा गदारोळ माजविण्याचे नेमके कारण काय, हा खरेतर उत्सुकतेचा प्रश्न आहे.
गोवा फॉरवर्डच्या अजेंड्यावर जमीन संरक्षण हा बीजविषय असल्याचे कळंगुटकर म्हणतात. वास्तविक हे जनतेला खरोखरच मान्य होईल काय? परवाच कुंभारजुवेत गोवा फॉरवर्ड पक्षाने एका व्यक्तीस प्रवेश दिला होता. त्यावेळी या बीजविषयाचा विचार झाला होता काय, असाही सवाल केला जातो.
एका बारीक विषयावरून गोवा फॉरवर्ड पक्षाने जी आदळआपट सुरू केली आहे, ती पाहता पक्षातील काही अतिउत्साही आणि उतावीळ घटकांना नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त होते. अमित पाटकर अध्यक्ष होण्यापूर्वीपासून आपण काँग्रेस युतीचा घटक आहोत, असे म्हणून विद्यमान प्रदेशाध्यक्षांचा अनादर करणे हे कितपत योग्य ठरते ? एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवून सत्तेपर्यंत चढण्यासाठीच ही युती असेल, तर मग जनतेला सावध राहावे लागेल.

  • Related Posts

    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा

    अन्यथा सरकारवर प्रभाव टाकून कोणताही नियम बदलून घेता येतो, असा संदेश उद्योगविश्वात गेला तर ती केवळ प्रशासनासाठी नव्हे, तर गोव्याच्या पर्यावरण, शेती आणि भवितव्यासाठीही धोक्याची घंटा ठरेल. धारगळ येथील डेल्टीन…

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    पर्यटनाचा अर्थ केवळ कॅसिनो, दारू आणि रात्रीची मौजमजा एवढाच मर्यादित असू शकत नाही. गोव्याची खरी ओळख त्याची संस्कृती, निसर्ग, वारसा, समुद्रकिनारे आणि स्थानिक जीवनशैली आहे. “नशामुक्त गोवा” ही घोषणा ऐकायला…

    You Missed

    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 13 views
    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 14 views
    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies

    शिक्षकांचा मानसिक ताण… शेवटी ऐकणार तरी कोण?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 14 views
    शिक्षकांचा मानसिक ताण… शेवटी ऐकणार तरी कोण?

    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 18 views
    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    06/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 17 views
    06/08/2026 e-paper

    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 26 views
    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा