शुक्रवारी पणजीत महाआंदोलनाचा वणवा

युनिटी मॉल, प्रशासन स्तंभाविरोधात चिंबलवासिय आक्रमक

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

चिंबलच्या पठारावर आणि तळ्यार तळ्याला भविष्यात धोका निर्माण करणारे युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प रद्द करूनच समाधान मिळणार, असा निर्धार चिंबलवासियांनी केला आहे. या आंदोलनाचे उग्र रूप म्हणून शुक्रवार, ३० रोजी पणजीत महाआंदोलन होणार असून हजारोंच्या संख्येने लोक राजधानीत रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा गोविंद शिरोडकर यांनी केली.
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चिंबलवासियांनी बांबोळी येथील शासकीय कार्यक्रमस्थळी आंदोलन केले. अंगाला झाडांच्या वेलींनी कवटाळून आणि हात बांधून त्यांनी हे सांकेतिक आंदोलन केले. प्रजासत्ताक म्हणजे शासनाची मूळ सत्ता नागरिकांकडे असणे. नागरिक गेले ३० दिवस आंदोलन करत आहेत, तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा परिस्थितीत या सरकारला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल यावेळी करण्यात आला.
जनतेच्या भावनांची कदर करणे, जनतेला हवे ते देणे आणि जल, जमीन व जंगलांचे संरक्षण करून भावी पिढीला निश्चिंत करण्याचे कर्तव्य हे सरकारचे आहे. चिंबलवासियांच्या या आंदोलनाने सरकारची असंवेदनशीलता उघड झाली, असा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला.
आदिवासी पोलिसांचा वापर
चिंबलकरांच्या आंदोलनाला अडविण्यासाठी सरकारने प्रामुख्याने आदिवासी समाजातील पोलिस अधिकाऱ्यांचा वापर केल्याचा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला. हे म्हणजे आदिवासी समाजालाच एकमेकांविरोधात उभे ठाकण्याचा डाव असल्याने सरकार बहुजन समाजाची थट्टा करत आहे की काय, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजधानीत महाआंदोलनाचा वणवा
शुक्रवार, ३० रोजी पणजीत महाआंदोलन होणार असून राज्यभरातून आदिवासी समाज तसेच चिंबलवासियांना पाठींबा देणारे लोक हजारोंच्या संख्येने हजर राहणार आहेत. या महाआंदोलनासाठी आजपासून जनजागृती सुरू होईल. राज्यातील भाजप सरकार आदिवासी समाजाची गळचेपी करून त्यांचे भवितव्य उध्वस्त करण्यासाठी आतूर झाले आहे, हेच या दोन्ही प्रकल्पांच्या अट्टाहासातून स्पष्ट होते, अशी टीका अजय खोलकर यांनी केली. कुठल्याही परिस्थितीत हे दोन्ही प्रकल्प चिंबलात नकोत, असा वज्रनिर्धार चिंबलवासियांनी केला.

  • Related Posts

    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest

    Goa’s private bus owners have issued a 7-day ultimatum to the government, demanding permits for KTC-hired electric buses and threatening a peaceful black flag protest. They claim the electric buses’ overlapping operations are harming their livelihoods.

    पत्रकारांना ‘दिमागी नक्षल’ ठरवणे निषेधार्ह

    भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत ‘दिमागी नक्षल’ नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगतात, त्यांना वैचारिक पाठिंबा देतात, सुरक्षा जवानांच्या मृत्यूचा आनंद साजरा करतात तसेच संसदीय प्रक्रियेतून तोडगा शोधण्याऐवजी रस्त्यावरील आंदोलनाचे समर्थन करतात, असा आरोप केला होता.

    You Missed

    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 9 views
    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest

    पत्रकारांना ‘दिमागी नक्षल’ ठरवणे निषेधार्ह

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 17 views
    पत्रकारांना ‘दिमागी नक्षल’ ठरवणे निषेधार्ह

    Congress demands probe into alleged ‘parallel cash economy’ in Colvale Jail

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 23, 2026
    • 17 views
    Congress demands probe into alleged ‘parallel cash economy’ in Colvale Jail

    Kejriwal to Hold Goa Town Hall Against ‘Forced E20’ on August 25

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 22, 2026
    • 21 views
    Kejriwal to Hold Goa Town Hall Against ‘Forced E20’ on August 25

    22/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 22, 2026
    • 26 views
    22/08/2026 e-paper

    १३७१ कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 22, 2026
    • 22 views
    १३७१ कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला