सुर्ला – साखळीचा डोंगर साफ होणार ?

डंप हाताळणीसाठी साळगांवकर कंपनीला मंजुरी

गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
डिचोली तालुक्यातील साखळी मतदारसंघातील सुर्ला गावाजवळील खनिज मातीने तयार झालेला डोंगर लवकरच साफ होणार आहे. राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या खनिज डंप हाताळणी धोरणानुसार व्ही.एम. साळगांवकर कंपनीला या डंपच्या हाताळणीसाठी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. पर्यावरण आणि इतर आवश्यक दाखले मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तत्पूर्वी जागा साफ करण्याच्या उद्देशाने झाडे हटविण्यात येत असल्याची माहिती कंपनीच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुर्ला गावातील या डोंगरावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे परिसरात चर्चा रंगली आहे. सुर्ला पंचायतीने या घटनेबाबत वन खात्याकडे स्पष्टीकरण मागितले असले तरी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सुर्ला पंचायतीला पत्र पाठवले आहे, मात्र त्या पत्रात नेमके काय नमूद आहे, हे स्पष्ट झालेले नाही. पंचायतीकडून स्थानिकांना या विषयात पाठींबा दिला जात असला तरी राजकीय दबावामुळे कोणीही उघडपणे भाष्य करण्यास तयार नाही.
कंपनीकडून खुलासा:
गांवकारी डिजिटल पेपर तसेच सोशल मीडियावर सुर्ला गावातील वृक्षतोडीची माहिती प्रसारित झाल्यानंतर व्ही.एम. साळगांवकर कंपनीच्या जनसंपर्क विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले. राज्य सरकारच्या खाण खात्याने अधिसूचित केलेल्या डंप हाताळणी धोरणानुसारच कंपनीला सुर्ला येथील डंप हाताळणीसाठी तत्त्वतः मंजुरी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने संबंधित जमीन खरेदी केली असून, म्यूटेशनची प्रक्रिया सुरू असल्यामुळे कंपनीचे नाव एक चौदाच्या उताऱ्यावर अद्याप नोंदवले गेलेले नाही.
१९८० ते २००७ दरम्यान कंपनीच्या सुर्ला येथील खाणींमधून टाकाऊ खनिज माती या ठिकाणी टाकण्यात आली होती. ही माती हलक्या स्वरूपाची असल्यामुळे ती कोसळू नये म्हणून कंपनीने वनीकरण केले होते. आता सरकारच्या धोरणानुसार डंप हाताळणीस मंजुरी मिळाल्याने त्या अनुषंगाने जागा रिकामी करण्याचे काम सुरू आहे. वन खात्याकडून यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. लाकडांची वाहतूक सुलभ होण्यासाठी योग्य रस्त्याची सोय केल्यानंतर ती हटवली जातील, अशी माहितीही देण्यात आली.
स्थानिकांनी परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात झाडे तोडल्याचा आरोप केला असता, त्याबाबत माहिती वन खात्याकडूनच मिळेल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

  • Related Posts

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली.…

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    जीसीझेडएमएच्या निरीक्षणांकडे सरकारचे दुर्लक्ष गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) मांडवी नदीत डेल्टा प्लेझर क्रूझ कंपनी प्रा. लि. यांच्या एम.व्ही. डेल्टीन रॉयल या नव्या भव्य जहाजास परवानगी देण्यासंदर्भात गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन…

    You Missed

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 14 views
    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 20 views
    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 21 views
    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 25 views
    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 25 views
    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 17 views
    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi