समेटाच्या दिशेने आरजीपीचे पहिले पाऊल

मनोज परब यांच्याकडून माणिकराव ठाकरेंची माफी

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागितली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांची आघाडी व्हावी, अशी तीव्र इच्छा आरजीपीची होती. ती फसल्याच्या नैराश्यातून माणिकराव ठाकरे यांच्याप्रती चुकीचे शब्द तोंडी आले. आपण त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून मनोज परब यांनी नव्या समेटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागला असला तरी या निकालातून विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदाच भाजप आघाडीला होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकांनी विरोधकांनाही विश्वासाचा कौल दिला आहे आणि विरोधकांनी एकत्र आल्यास भाजपला पराभूत करणे शक्य आहे, असा स्पष्ट संदेश या निकालातून प्रकट झाला आहे. सोमवारी जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आपल्या सोशल मीडियावरून काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागणारा संदेश टाकल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.


आरजीपीने पुन्हा एकदा नव्याने महाविरोधी आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चेसाठी पहिले पाऊल टाकले आहे. या निवडणुकीत आरजीपीला दोन जागा मिळाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस आणि आरजीपी एकत्र आल्यास त्याचा जबर परिणाम भाजप आघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ताच आघाडीसंबंधीची चर्चा सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे.
महाविरोधी आघाडी व्हायलाच हवी – युरी आलेमाव
जिल्हा पंचायतीसाठी महाविरोधी आघाडी होणे शक्य होते, परंतु पक्षांतर्गत काही घटकांच्या नाकर्तेपणामुळे ती फसली. आपण अजूनही महाविरोधी आघाडीसाठी आग्रही आहोत. भाजपची भ्रष्ट आणि गोवाविरोधी राजवट उलथवून टाकण्यासाठी विरोधकांनी तडजोड करावीच लागेल. गोव्याचे हित आणि भविष्य लक्षात घेऊन ही आघाडी होण्याची गरज आहे. काँग्रेस श्रेष्ठीं समोर आपण ही भूमिका मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

  • Related Posts

    राष्ट्रपतींचा मान राखा

    न्यायसंस्थेत आणि राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते सामान्य कष्टकरी गोंयकारांच्या कायदेशीर आधारासाठी विविध चळवळीत सक्रीय होते. तीच चळवळी वृत्ती आजही त्यांच्या रक्तात वाहत असल्याने ते आपल्या अवतीभोवतीचे चित्र पाहून व्याकुळ झाले.…

    Congress Reviews Goa Political Situation, Begins Strategy for Ponda By-Poll and 2027 Elections

    Panaji: The Goa unit of the Indian National Congress held a strategic meeting at the AICC headquarters to discuss the political situation in the state and plan the party’s roadmap…

    You Missed

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    14/04/2026 e-paper

    14/04/2026 e-paper

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid

    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid