शेर्लेकरांच्या व्हिडिओची तक्रार अयोध्येत

हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कनेक्शनमुळे प्रश्न

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

कारापूर-सर्वण येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओची थेट अयोध्येत भाजपच्या जिल्हा युनिटने पोलिसांत तक्रार केल्याने नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण याच अयोध्येत हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचा मोठा रिअल इस्टेट प्रकल्प उभा राहत आहे.

शेर्लेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कारापूर आंदोलनातील हस्तक्षेपावर टीका करताना “ ब्रोकर सीएम ऑफ ब्रोकर जनता पार्टी “ असा उल्लेख केला होता. आंदोलनकर्त्यांचा आरोप होता की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर शेर्लेकर यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

मात्र गोव्यातील या वादावर शेकडो किलोमीटर दूर असलेल्या अयोध्या भाजप जिल्हा युनिटने पोलिसांत तक्रार का केली? हा प्रश्न आता आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. १८ सप्टेंबरच्या या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता कलम १७९ अंतर्गत शेर्लेकर यांना २४ सप्टेंबर रोजी अयोध्येत हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली.

विशेष म्हणजे हाऊस ऑफ अभिनंदन लोढा अयोध्येत ‘द शरयू ’ हा मोठा प्रकल्प विकसित करत आहे. त्यामुळे कारापूरमधील या कंपनीविरोधातील आंदोलनाची दखल अयोध्येतील भाजपाने घेतल्यावरून हा विषय चर्चेचा ठरला आहे.

कारापूर आंदोलनाशी संबंधित प्रकरणे यापूर्वी गोवा आणि मुंबईपर्यंत पोहोचली आहेत. मुंबईत हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून काही आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला, तर ह्याच कंपनीने शेर्लेकर व इतरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १५ कोटींचा मानहानी दावाही दाखल केला आहे.

  • Related Posts

    प्रदूषित हवेमुळे गोव्याचा कोंडमारा

    दिवाळीनंतर हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ ——————————————————— गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) दिवाळीच्या उत्सवानंतर राज्यातील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री पणजीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १७४ वर…

    मुख्यमंत्र्यांना पदावरून ताबडतोब हटवा: माजी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. शीतल नाईक यांची मागणी

    माजी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. शीतल नाईक यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून तातडीने हटवण्याची मागणी केली आहे, विशेषतः म्हापसा येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    You Missed

    10/11/2026 e-paper

    10/11/2026 e-paper

    मशाल पेटवणार कोण?

    मशाल पेटवणार कोण?

    प्रदूषित हवेमुळे गोव्याचा कोंडमारा

    प्रदूषित हवेमुळे गोव्याचा कोंडमारा

    मुख्यमंत्र्यांना पदावरून ताबडतोब हटवा: माजी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. शीतल नाईक यांची मागणी

    मुख्यमंत्र्यांना पदावरून ताबडतोब हटवा: माजी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. शीतल नाईक यांची मागणी

    Goa Government Grants OBC Status to Transgender Community

    Goa Government Grants OBC Status to Transgender Community

    लैंगिक अत्याचाराने गोवा हादरला

    लैंगिक अत्याचाराने गोवा हादरला