तंत्रज्ञान उपकरण योजनेचा गैरवापर

मुख्य सचिवांसह अनेक अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

गांवकारी,दि. १० (प्रतिनिधी)

गोवा सरकारच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना संगणक व इतर तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप करत मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांच्यासह अनेक वरिष्ठ आयएएस व गोवा नागरी सेवा (सीजीएस) अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अॅड. अजय प्रभुगावकर यांनी सादर केलेल्या तक्रारीत सरकारी कार्यालये व अधिकृत निवासस्थानी आधीच संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध असतानाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “तंत्रज्ञान उपकरण पुरवठा योजना” अंतर्गत प्रत्येकी ₹१ लाखांपर्यंतची परतफेड (रिइम्बर्समेंट) घेतल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशाव्दारे ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार पात्र अधिकाऱ्यांना दर पाच वर्षांनी तंत्रज्ञान उपकरणांच्या खरेदीसाठी खर्चाची परतफेड मिळू शकते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाकडून यापूर्वी अशाच प्रकारची उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली नसावीत, अशी महत्त्वाची अट असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत सुमारे ₹१.९५ कोटी खर्च करण्यात आला असून लाभार्थ्यांमध्ये अनेक वरिष्ठ आयएएस अधिकारी तसेच विद्यमान मुख्य सचिव यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि सरकारी निवासस्थानी आधीच अत्याधुनिक संगणकीय सुविधा उपलब्ध असताना अतिरिक्त उपकरणांसाठी सार्वजनिक निधीतून परतफेड देणे योग्य नाही. तसेच या योजनेतून खरेदी करण्यात आलेली उपकरणे अखेरीस संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक मालमत्ता बनत असल्याने सार्वजनिक पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, २०१९ मध्ये सरकारने मंत्री आणि सचिवांना देण्यात येणाऱ्या अधिकृत मोबाईल हँडसेटच्या किंमतींवर मर्यादा घालणारे परिपत्रक जारी केले होते. सदर योजना त्या धोरणाशी विसंगत आहे का, याबाबतही तक्रारदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
दहा दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास हे प्रकरण न्यायालयीन तसेच इतर प्रशासकीय मंचांवर नेण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure