युनिटी मॉल रद्द होणे कठीण

सरकारचा युटर्न; चिंबलवासीय आक्रमक

गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)

चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा बहुप्रतिष्ठित प्रकल्प आहे आणि तो रद्द करणे कठीण असल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलक चिंबलकरांच्या शिष्टमंडळाला दिली. प्रशासन स्तंभ मात्र रद्द केला जाऊ शकतो. तरीही तळ्यार तळ्याच्या प्रभाव क्षेत्राअंतर्गत हा प्रकल्प येतो काय, याची नव्याने सर्वेक्षणाद्वारे शहानिशा केली जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
गेले २६ दिवस आंदोलन करणाऱ्या चिंबलवासीयांनी गोविंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीत चिंबलवासीयांनी पूर्णतः आपला विषय त्यांच्या समोर मांडला. हे प्रकल्प लोकांच्या माथी मारू नयेत; किंबहुना याठिकाणी कृषी किंवा जैवविविधतेसंबंधी एखादा प्रकल्प उभारावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे प्रकल्प या परिसराच्या जैवविविधतेला घातक ठरणार आहेत. भविष्यात याचे परिणाम तळ्यार तळ्यावर होतील आणि पूर्वजांनी भविष्यासाठी संवर्धन करून ठेवलेला हा वारसा नष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली. हा नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे. पाणी हे जीवन आहे आणि त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही शिष्टमंडळाने सांगितले.
२५ कोटी रुपयांचा खर्च
चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ या प्रकल्पांच्या नियोजनावरच आत्तापर्यंत २५ कोटी रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिष्टमंडळाला दिली. हा प्रकल्प तळ्यार तळ्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी एनआयओ आणि जलस्त्रोत खात्याकडून नव्याने सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मान्य केले. या सर्वेक्षणावेळी चिंबलवासीयांनी उपस्थित राहावे. या सर्वेक्षणानंतर पुन्हा एकदा चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे या भेटीत मान्य करण्यात आले.
आंदोलन कायम, प्रसंगी उग्र
मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून काहीही तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन कायम राहील, अशी घोषणा गोविंद शिरोडकर यांनी केली. या भेटीत झालेल्या चर्चेचा इतिवृत्तांत आंदोलकांसमोर दिला जाईल आणि त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल. सरकार कठोरपणे वागत असेल तर हे आंदोलन अधिक उग्र बनण्याचे संकेतही यावेळी चिंबलवासीयांनी दिले.

  • Related Posts

    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे महत्वाचे निकाल गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी दोन महत्वाच्या निकालांत पत्रकार तरुण तेजपाल यांना २०१३ मधील महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार…

    गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार पुरस्कारप्राप्त ‘आंसेसांव’

    पुरस्कारप्राप्त कोंकणी लघुपट ‘आंसेसांव’ ची १५व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवासाठी निवड, जिथे तो एकमेव कोंकणी चित्रपट म्हणून झळकणार आहे.

    You Missed

    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    06/08/2026 e-paper

    06/08/2026 e-paper

    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा

    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा

    गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार पुरस्कारप्राप्त ‘आंसेसांव’

    गोवा मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार पुरस्कारप्राप्त ‘आंसेसांव’

    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar

    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar