४० जागांसाठी काँग्रेसकडे ४०० हून अधिक अर्ज

१ डिसेंबरला इच्छुकांची अंतिम संख्या स्पष्ट होणार
——————————————————————————–
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील ४० मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज मागवले असून आतापर्यंत ४०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. २३ नोव्हेंबरपासून अर्जवाटप सुरू झाले असून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १ डिसेंबरला अर्जांची अंतिम संख्या स्पष्ट होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही उमेदवारीची संधी मिळावी, यासाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. इच्छुकांना गट, जिल्हा किंवा प्रदेश काँग्रेस समितीकडे अर्ज सादर करता येतील. अर्जात पक्षाचे सदस्यत्व, प्रवेशाचे वर्ष आणि संघटनात्मक कामाचा तपशील मागवण्यात आला आहे.
प्राप्त अर्जांची पक्षाच्या छाननी समितीकडून तपासणी केल्यानंतर ते अंतिम निवडीसाठी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवले जातील. दरम्यान, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सशी युतीची चर्चा सुरू असून जागावाटप निश्चित झाल्यानंतर मित्रपक्षांच्या वाट्याला जाणाऱ्या मतदारसंघांतील अर्जांबाबत निर्णय घेतला जाईल, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    गावांच्या अस्तित्वाच्या किंमतीवर विकास नको!

    करापूर-सर्वणच्या प्रश्नावर सरकार कोणती भूमिका घेते, यावरून गोव्याच्या विकासात गावांना किती स्थान आहे, हे दिसून येईल. ——————— – जॉन आगियार डिचोली तालुक्यातील करापूर-सर्वण येथे ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ (एचओएबीएल)…

    काँग्रेस आघाडीचा गुंता सुटणार ?

    येत्या दोन दिवसांत महत्त्वपूर्ण बैठकीची शक्यता ————————————————————– गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आघाडीच्या चर्चेला गती देण्याचे निर्देश दिल्यानंतर गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षासोबतच्या…

    You Missed

    मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    गावांच्या अस्तित्वाच्या किंमतीवर विकास नको!

    गावांच्या अस्तित्वाच्या किंमतीवर विकास नको!

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

    केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

    ४० जागांसाठी काँग्रेसकडे ४०० हून अधिक अर्ज

    ४० जागांसाठी काँग्रेसकडे  ४०० हून अधिक अर्ज

    सत्तेसमोर सत्याची कसोटी

    सत्तेसमोर सत्याची कसोटी