गांवकारी,दि. २८ (प्रतिनिधी)
‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी केपे मतदारसंघातील खोला, नुवे, मोरपिर्ला आणि बार्से येथे जनता दरबार घेणार आहेत. मुख्यमंत्री नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेणार असून, आदिवासी कल्याण, वीज, जलस्रोत आणि सार्वजनिक बांधकाम यांसह २७ विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमांची ठिकाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहेत. खोला पंचायत सभागृह सकाळी ११. ३० ते दुपारी १.३०, नुवे सामुदायिक सभागृह दुपारी ३.३० ते ४.३०,
मोरपिर्ला पंचायत सभागृह सायंकाळी ५ ते ६, बार्से ग्रामपंचायत सभागृह, महादेव मंदिराजवळ सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३०.





