मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

गांवकारी,दि. २८ (प्रतिनिधी)
गोव्यातील मातृदेवतांच्या उपासना परंपरांचा अभ्यास मांडणाऱ्या डॉ. रोहित फळगांवकर यांच्या ‘वरशीप ऑफ मदर गोडसीस ऑफ गोवा ’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. पाटो, पणजी येथील संस्कृती भवनात हा कार्यक्रम झाला. मंगळुरूच्या विश्व कोंकणी केंद्राच्या ‘वर्धनी फेलोशिप’च्या सहकार्याने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.

गोव्यात मातृदेवतेला श्रद्धेचे स्थान आहे. तिच्या उपासनेशी संरक्षण, आरोग्य, न्याय आणि समृद्धीच्या संकल्पना जोडलेल्या असून, या परंपरेतून स्थानिक समाजाची सामूहिक ओळखही व्यक्त होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुरातत्त्व, मूर्तिशास्त्र, लोकपरंपरा आणि स्थानिक समाजाच्या पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या स्मृती यांच्या आधारे ग्रंथाने गोव्यातील देवी उपासनेचे विविध पैलू उलगडले आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी डॉ. फळगावकर यांच्या संशोधनाचे कौतुक केले. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा अभ्यास आणि जतन करणाऱ्या संशोधनाला पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी विश्व कोंकणी केंद्र आणि वर्धनी फेलोशिपचे आभार मानले. यावेळी त्यांनी सी. ए. नंदगोपाल शेणई आणि उषा शेणई यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. याप्रसंगी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर(आयएएस) हजर होते.

गोव्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सावंत यांनी सांगितले. त्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये गोवा राज्य वारसा धोरण, राज्य हस्तलिखित अभियान, वस्तुसंग्रहालये आणि अभिलेखागारांचे काम तसेच दिवाडी येथील कोटीतीर्थ कॉरिडॉर यांचा त्यांनी उल्लेख केला.

  • Related Posts

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    १ डिसेंबरपासून अर्ज, दरमहा सुमारे २० हजार ———————————————————————————– गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) राज्य विधानसभा निवडणूकीला आता फक्त दोन ते अडीच महिने बाकी असताना सरकारने बेरोजगारांसाठी अप्रेंटिसशीप योजनेचे गाजर पुढे केले…

    केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

    गांवकारी,दि. २८ (प्रतिनिधी) ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी केपे मतदारसंघातील खोला, नुवे, मोरपिर्ला आणि बार्से येथे जनता दरबार घेणार आहेत. मुख्यमंत्री नागरिकांच्या समस्या…

    You Missed

    मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    मातृदेवता उपासनेचा अभ्यास मांडणाऱ्या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    गावांच्या अस्तित्वाच्या किंमतीवर विकास नको!

    गावांच्या अस्तित्वाच्या किंमतीवर विकास नको!

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    निवडणूकीच्या तोंडावर `अप्रेंटिसशिप`चे गाजर

    केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

    केपेत उद्या ‘सरकार तुमच्या दारी’

    ४० जागांसाठी काँग्रेसकडे ४०० हून अधिक अर्ज

    ४० जागांसाठी काँग्रेसकडे  ४०० हून अधिक अर्ज

    सत्तेसमोर सत्याची कसोटी

    सत्तेसमोर सत्याची कसोटी