बटेंगे तो खत्म होंगे…

गोव्यात ८ आमदार भाजपात गेल्यानंतर उर्वरीत ३ आमदारांनाही पक्षाला आपल्यासोबत ठेवणे जमत नाही. हे आमदार भाजपने नाकारले आहेत की भाजपने पेरले आहेत, याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे.

कष्ट, मेहनत, संघटना आणि चिकाटी या बळावर निवडणूका जिंकण्याची संस्कृती काँग्रेस पक्षात नाही. देशात स्वातंत्र्य चळवळीचा वारसा खांद्यावर घेऊन राजकारणात यश मिळवलेल्या काँग्रेसने आपली स्वतंत्र संघटना, विचारधारेचा प्रसार आदींसाठी विशेष लक्ष कधीच दिले नाही. सत्ता ही कायम आपल्याकडेच राहणार असा काहीसा भ्रम या पक्षाला झाला आणि त्याचे पर्यावसान म्हणून की काय आता एकापाठोपाठ एक राज्य काँग्रेस पक्ष सत्ता गमावत चालला आहे. महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत महायुतीने एतिहासिक विजय मिळवला आहे. बहुमताच्या १४४ जागांतील भाजपने १२० पर्यंत आघाडी घेतली आहे यावरून भाजपने एकहाती हे राज्य आपल्या कब्ज्यात मिळवले आहे. प्रचंड मेहनत, रणनिती, संघटना आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी ही भाजपची नेहमीच ताकद राहीलेली आहे. एवढे करून आघाडी सरकारचा फॉर्म्यूलाही भाजपने यशस्वी करून दाखवत सत्तेसाठी सोबत आणलेल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेणे आणि त्यांना बरोबर ठेवणे हे भाजपलाच जमलेले आहे. भाजपने स्वबळावर बहुमताच्या जवळील आकडा पार केलेला असला तरी शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाला सोबतीला घेऊन त्यांनी नकळतपणे विरोधकांना कमकुवत बनवले हीच तर त्यांची रणतिनी. सर्वांत मोठा पक्ष या नात्याने सरकारचे नेतृत्व भाजपच करणार आहे आणि इतर सोबतींना सत्तेत चिकटून राहण्यासाठी भाजपची हुजरेगिरी मान्य करावी लागेल, हे देखील तेवढेच खरे. लोकसभा निवडणूकीच्या काळात इंडिया आघाडीचा फॉर्म्यूला वापरून काँग्रेसने कसेबसे आपले अस्तित्व राखले खरे परंतु भाजपला पराभूत करण्यासाठी इतरांना सोबत घेण्याबाबत काँग्रेसची कजुंषी काही लपून राहीलेली नाही. पक्षाच्या नेत्यांना अजूनही स्वबळाच्या ताकतीचा घमेंड आहे परंतु पक्षांतर्गत मतभेद, संघर्ष आणि पाय ओढण्याची जुनी संस्कृती तशीच असल्याने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची सवयच काँग्रेसला लागून राहीलेली आहे. कर्नाटकात सत्ता गमावल्यानंतर भाजपने महाराष्ट्र काबीज करण्याचा चंगच बांधला होता आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. महाराष्ट्राच्या भवितव्याचा जयघोष करणाऱ्या ठाकरेंना स्वतःला एकत्र येणे जमत नाही तिथे विरोधकांना ते एकत्र कसे काय आणू शकतील. उध्दव आणि राज ठाकरे यांनी खरेच महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा यासारखा दुसरा सुवर्णक्षण असूच शकत नव्हता. शरद पवारांचे आता वय झाल्यामुळे अजित पवारांना पुढील राजकीय भवितव्यासाठी त्यांच्या कलाने वागणे परवडणारे नव्हते आणि एकनाथ शिंदे यांनी तर ठाकरेंच्या पक्षातील वर्चस्वालाच सुरूंग लावून मराठी माणसाची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे घेतली आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने इतर भाजप विरोधकांनाही जुळवून घ्यावेच लागेल अन्यथा बटेंगे तो खत्म होंगे, हे काँग्रेसने आता लक्षात घ्यायला हवे. गोव्यात ८ आमदार भाजपात गेल्यानंतर उर्वरीत ३ आमदारांनाही पक्षाला आपल्यासोबत ठेवणे जमत नाही. हे आमदार भाजपने नाकारले आहेत की भाजपने पेरले आहेत, याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे.

  • Related Posts

    ऑर्डर.. ऑर्डर…

    केवळ भावना किंवा आपल्याला काय वाटते याला अर्थ नाही तर ते सिद्ध करण्याची किंवा त्याबाबतचे पुरावे हाती असण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाला सशर्त मान्यता दिली…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    हायकोर्टाने शर्ती आणि अटींची बंधने जी सरकार आणि आयोजकांना घातली आहेत त्यांचे खरोखरच पालन होते काय हे न्यायदेवता आता डोळ्यांवरील पट्टी हटविल्यामुळे पाहु शकेल, एवढीच काय ती अपेक्षा सर्वसामान्य नागरिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    21/12/2024 e-paper

    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!