गोवा विधानसभेत थेट भरती कशी ?

मडगांवचो आवाजचे युवा नेते प्रभव नाईक यांचे निवेदन

गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी)

भाजप सरकारातील काही मंत्री व आमदारांनी राज्य कर्मचारी भरती आयोगाला विरोध केला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभा सचिवालयाने थेट भरतीसाठी पदांची घोषणा केल्याने मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नाईक यांनी याला तीव्र हरकत घेतली आहे.
मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नाईक यांनी गोवा विधानसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या थेट भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा सचिवांना निवेदन सादर केले आहे.
विधानसभा सचिवालयाने १ जून २०२६ रोजी विविध पदांसाठी थेट भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात अंडर सेक्रेटरी, सेक्शन ऑफिसर, रिपोर्टर, जनसंपर्क अधिकारी, स्टेनोग्राफर ग्रेड-२, चालक आणि मल्टी टास्किंग स्टाफ अशा पदांचा समावेश आहे.
प्रभव नाईक यांनी म्हटले आहे की, राज्यात पारदर्शक आणि गुणवत्ताधारित भरतीसाठी गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि गोवा लोकसेवा आयोग यांसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा सचिवालयाने या संस्थांना वगळून स्वतःच भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने बेरोजगार युवकांमध्ये संशय आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यांनी निदर्शनास आणून दिले की, काही दिवसांपूर्वीच भारताच्या उपराष्ट्रपतींनी गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पारदर्शक भरती प्रक्रियेचे कौतुक केले होते. अशा वेळी स्वतंत्र भरती संस्थांना बगल देऊन थेट भरती करण्याचा निर्णय हा विरोधाभासी संदेश देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रभव नाईक यांनी विधानसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या सर्व जाहिराती तात्काळ मागे घेऊन संबंधित रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्याची मागणी केली आहे. यामुळे भरती प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहील तसेच पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
आयोगाला डावलून युवकांची थट्टा नको
आयोगाला डावलून आपल्या मर्जीप्रमाणे पदे भरायची असतील तर मग पदांच्या जाहिराती, अर्ज मागवणे आणि लेखी परीक्षा व भरती प्रक्रियेचा फार्स करून बेरोजगारांची थट्टा का करता, असा सवाल प्रभव नाईक यांनी केला. आपल्या मर्जीतीलच लोकांचा भरणा करायचा असेल तर मग तसा कायदा तयार करा आणि पदे भरा. विनाकारण बेरोजगार युवकांच्या भावनांशी खेळ करून त्यांची फसवणूक करू नका, असा टोलाही प्रभव नाईक यांनी हाणला.

  • Related Posts

    1526–2026: 500 Years of the Foral

    On 16 September 1526, the Foral dos usos e costumes dos Gancares e Lavradores desta Ilha de Goa e outras annexas a ella recorded the uses, customs and practices governing the Gaunkars and cultivators of Goa. Exactly five hundred years later, on 16 September 2026, that history has acquired striking contemporary relevance as questions concerning Communidade land return to the courtroom.

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    This is an emotional plea from a Goan to Lord Ganesha, urging him to awaken the wisdom in the hearts of Goans to protect their land. The author expresses concern about unchecked development, the sale of land, and money-driven politics that threaten Goa’s natural beauty, cultural identity, and the future of its youth. The plea is for discernment, courage, and a collective resolve to prioritize Goa’s future over personal gain, ensuring it remains an invaluable homeland for generations to come.

    You Missed

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’