“इकडे आड, तिकडे विहीर”

एसटी – मराठा समाजाच्या कचाट्यात भाजपची कोंडी

गांवकारी, दि.१ (प्रतिनिधी)
राज्यातील अनुसूचित जमात (एसटी) समाजाला संविधानिक राजकीय आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यावरून भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. २०२७ च्या निवडणुकीत आरक्षण देण्याचे वचन पक्षाने दिले असले तरी मराठा समाजाकडून त्याला आक्षेप घेतल्याने भाजपसमोर इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गोवा विधानसभेत एसटी आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर, सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्ळीकर, धाकू मडकईकर आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाने वेळेत आवश्यक पावले उचलून एसटी समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी केली.
निवेदनात नमूद केले आहे की, एसटी आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

एसटी नेत्यांची एकजूट
सध्या सर्व प्रमुख एसटी नेते भाजपात आहेत. सभापती डॉ. गणेश गांवकर, क्रीडामंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी प्रेरणा दिनानिमित्त मतभेद विसरून एकत्र येण्याची घोषणा केली. या एकजुटीमुळे भाजपसमोर अधिक चिंता निर्माण झाली आहे.
भाजपाने २०२७ च्या निवडणुकीत आरक्षण देण्याचे वचन दिले असल्याने ते फोल ठरल्यास समाजाचा रोष पत्करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून हा विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मराठा समाजाची नाराजी
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने एसटी आरक्षणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच आकडेवारीवरून आरक्षण निश्चित व्हावे, अशी त्यांची भूमिका आहे. केवळ नाराजी दूर करण्यासाठी आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पेडणे मतदारसंघामुळे मराठा समाजावर अन्याय झाल्याचे त्यांनी नमूद केले. आता एसटीसाठी राखीव ठेवण्याची योजना असलेले काणकोण, केपे आणि सांगे हे मतदारसंघ मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने पुन्हा अन्याय होईल, अशी त्यांची भूमिका आहे.
सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांचे राजकीय भवितव्य आरक्षणामुळे धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच मराठा समाज संघटनेने पुढाकार घेऊन हा विषय भाजपसमोर उपस्थित करण्याचे ठरवले आहे.

  • Related Posts

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा
    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    नवी दिल्ली, दि. ११ : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी नीती आयोगाच्या ११ व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीत गोव्याच्या मानव संसाधन विकास, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), महिला…

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    विजय सरदेसाई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीगांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून फातोर्डा येथील घाऊक मासळी बाजारालगतची संपादीत भातशेती जमीन शेतकरी…

    You Missed

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा
    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा<br>मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    11/06/2026 e-paper

    11/06/2026 e-paper

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    विकासाचा लेखाजोखा कधी?

    Prabhav Naik Seeks Transparency on Proposed Hydraulic Parking Project in Margao

    Prabhav Naik Seeks Transparency on Proposed Hydraulic Parking Project in Margao

    Konkan Railway Detects Over 61,000 Ticketless and Irregular Travellers in May; Collects ₹3.70 Crore in Penalties

    Konkan Railway Detects Over 61,000 Ticketless and Irregular Travellers in May; Collects ₹3.70 Crore in Penalties