माझे घर; विरोधकांचा पोल खोलणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे शरसंधान

गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी)

गेली अनेक वर्षे अनधिकृततेच्या टांगत्या तलवारीखाली अनेक कुटुंबे जगत आहेत. या विषयावर अंतिम तोडगा काढून त्यांना त्यांच्या घरांचा मालकी हक्क देण्याच्या प्रयत्नातूनच माझे घर योजनेचा जन्म झाला. न्यायालयात याचिका दाखल करून काहीजण ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. “या लोकांचा योग्य वेळी पोल खोल करू,” असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर शरसंधान केले.
माझे घर योजनेच्या सनद वाटपाचा उत्तर गोवा जिल्हा कार्यक्रम आज मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तुफान गर्दी उसळलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी थेट विरोधकांवर शरसंधान साधले. “सर्वसामान्य गोंयकारांची घरे कायदेशीर होत आहेत हे पाहून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. काही विरोधकांनीच इतरांना पुढे करून न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांना सरकारचे कायदेतज्ज्ञ उत्तर देणार आहेत, परंतु या विरोधकांना योग्य वेळ येईल तेव्हा उघडे पाडू,” असेही ते म्हणाले.
“कोमुनिदाद जमिनीत इतकी वर्षे बेकायदा बांधकामे सुरू होती, ती वेळीच बंद केली असती तर त्या लोकांनी तिथे ती घरे उभारलीच नसती. आता ही जुनी घरे अधिकृत करत असताना कोमुनिदादला त्याची भरपाईही मिळवून दिली जाणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
१९७२ पूर्वीच्या घरांना सनद, २० कलमी कार्यक्रमांतर्गत घरांचा घोळ आदी अनेक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण तोडगा काढून ही योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
तीन महिन्यात कुळ-मुंडकार प्रकरणे निकाली

आगामी तीन महिन्यात कुळ-मुंडकार प्रकरणे निकालात काढली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. याव्यतिरिक्त माझा फ्लॅट ही योजनाही लवकरच कार्यान्वित केली जाईल. पैसे फेडूनही फ्लॅटांची मालकी न मिळालेल्या लोकांना यातून दिलासा मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या योजनेसाठी अर्ज न सादर केलेल्या लोकांनी ताबडतोब अर्ज भरून द्यावेत. सरकारी खाती त्यांना सहाय्य करणार आहेत. “विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छीमारमंत्री निलकंठ हळर्णकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार मायकल लोबो, प्रविण आर्लेकर, रूदोल्फ फर्नांडिस, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई, जीत आरोलकर, डॉ. चंद्रकांत शेटये, प्रमेंद्र शेट आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    कुंकळळी, दि. १६ : गोमंतकाच्या अस्तित्वासाठी, धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी १५८३ मध्ये कुंकळळीच्या महानायकांनी दिलेल्या बलिदानाला इतिहासात तोड नाही. त्यांच्या त्यागामुळेच गोमंतकीय समाज आपली संस्कृती, धर्म आणि अस्मिता जपू शकला,…

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    पणजी, दि. १६: गोव्यात ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाची सर्वसाधारण अंमलबजावणी तात्काळ स्थगित करून त्याबाबत स्वतंत्र वैज्ञानिक, आर्थिक आणि पर्यावरणीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस…

    You Missed

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    16/07/2026 e-paper

    16/07/2026 e-paper

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार