मोटरसायकल पायलटला ‘मिशन फॉर लोकल’चा मदतीचा हात

सगुण गवंडीला विमा सुरक्षा कवचाने दिलासा

गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)

‘मिशन फॉर लोकल, पेडणे’चे संस्थापक राजन कोरगांवकर यांनी पेडणेतील मोटरसायकल पायलटांसाठी सुरू केलेल्या विमा सुरक्षा कवचामुळे सगुण गवंडी यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. या विमा पॉलिसीच्या माध्यमातून गवंडी कुटुंबाला दर महिन्याला ₹२१,००० ची आर्थिक मदत मिळत असून, त्यामुळे उपचार खर्च आणि उदरनिर्वाह सुलभ झाला आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात सगुण गवंडी यांचा गंभीर अपघात झाला होता. डोक्याला जबर मार बसल्यामुळे ते कोमात गेले आणि त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. दीड महिना इस्पितळात दाखल राहिल्यानंतर ते सध्या घरी आहेत, मात्र दर पंधरवड्याला त्यांना इस्पितळात जावे लागते. मोटरसायकल पायलट व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे या अपघाताने कुटुंबावर मोठा आर्थिक ताण आला होता.
या कठीण काळात ‘मिशन फॉर लोकल’च्या विमा योजनेने त्यांना दिलासा दिला. सगुण गवंडी यांना दर महिन्याला ₹२१,००० चे अर्थसहाय्य मिळत असून, ते पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कामावर रुजू होईपर्यंत ही मदत सुरू राहणार आहे.
पेडणेतील मोटरसायकल पायलट व टॅक्सी व्यवसायिकांसाठी बजाज अलायन्झचा हा विमा उतरवण्यात आला होता. सगुण गवंडी यांच्या प्रकरणामुळे या योजनेचा नेमका उपयोग स्पष्ट झाला असून, पेडणेतील अनेक पायलटांनी संस्थापक राजन कोरगांवकर यांच्या उपक्रमाचे आभार मानले आहेत.
राजन कोरगांवकर म्हणाले, “संकटाच्या काळात कुणासमोर हात पसरण्याची वेळ माझ्या पेडणेकरांवर येऊ नये, यासाठी ही योजना राबवली. असा प्रसंग कुणावरही येऊ नये, परंतु जर आला तर त्यांना आधार मिळावा, हा हेतू होता. सुदैवाने सगुण गवंडी यांच्या कुटुंबाला ही योजना मदतीचा हात ठरली.”

  • Related Posts

    सावधान !

    मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…

    चंगळवादाचे मानसशास्त्र

    (जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक चितन ! ) ‘चंगळवाद’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक ‘चंगळ’ आणि दुसरा ‘वाद’. यातील ‘चंगळ’ शब्दाचा अर्थ आहे सुखसाधनांची रेलचेल! आणि वाद शब्दाचा…

    You Missed

    पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले

    पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले

    10/11/2025 e-paper

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !
    error: Content is protected !!