रेती, चिरे, ट्रक व्यावसायिकांना सोडले वाऱ्यावर

मिशन फॉर लोकल, पेडणेचे राजन कोरगांवकर यांचा आरोप

गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील रेती, चिरे तसेच ट्रक व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडून सरकार परप्रांतीय व्यावसायिकांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप मिशन फॉर लोकल, पेडणेचे संस्थापक राजन कोरगांवकर यांनी केला आहे. स्वयंपूर्णाचा नारा देणारे सरकार आपल्या गोवेकरांना फक्त दुसऱ्याकडे तुटपुंज्या नोकऱ्या करण्यासाठी का प्रवृत्त करत आहे, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पेडणे तालुक्यात आधीच रोजगार आणि व्यवसायाच्या संधी कमी आहेत. एकीकडे सरकारी नोकऱ्या नाहीत, तर खाजगी क्षेत्रातही पेडणेत नोकऱ्यांची संधी नाही. अशा परिस्थितीत अनेक तरुणांनी आपली सगळी पुंजी पणाला लावून विविध व्यवसाय सुरू केले आहेत. रेती, चिरे आणि ट्रक व्यवसाय हा इथल्या अनेक कुटुंबांचा फार जुन्या काळापासून पारंपरिक व्यवसाय आहे. या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन आहे. पेडणेतील विविध बड्या सरकारी प्रकल्पांत या व्यावसायिकांना संधी देण्यात आली नाही. सरकारकडून परप्रांतीय व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊन या पारंपरिक व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारल्याचा आरोप राजन कोरगांवकर यांनी केला.
अनेकांना आपला व्यवसाय बंद करून इतरांकडे तुटपुंज्या पगारावर नोकऱ्या स्वीकारण्याची वेळ आली आहे. एकीकडे स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गोवा असे नारे देणारे सरकार आपल्या कृतीतून नेमके उलटे वागत असल्याची टीका राजन कोरगांवकर यांनी केली.
हप्तेबाजी आणि परप्रांतीयांच्या जाचाने त्रस्त
पेडणेतील रेती, चिरे आणि ट्रक व्यावसायिक सरकारी पातळीवरील अनधिकृत हप्तेबाजीने त्रस्त झाले आहेत. रेती, चिरे आणि वाहतुकीसाठी ट्रक हा व्यवसाय म्हणजे काहीतरी मोठा चोरबाजार असल्यागत या व्यावसायिकांकडे पाहिले जात आहे. राज्यात रेतीवर बंदी आहे, पण डबल इंजिनची शेखी मिरवणाऱ्या सरकारला कायदेशीर परवाने देण्यात विलंब का होतो, असा सवाल कोरगांवकर यांनी केला.
चिरे खाणींसाठी आवश्यक परवान्यांच्या प्रक्रियेत अनेक अडचणी असल्यामुळे स्थानिकांना ते मिळवणे कठीण बनले आहे. या व्यवसायावरील अडचणींमुळे ट्रक व्यावसायिकांचा धंदा संकटात सापडला आहे. पोलिस, खाण, वाहतूक आदी खात्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने या व्यावसायिकांची लुबाडणूक सुरू आहे. ही लुबाडणूक त्वरीत थांबवावी, असे आवाहन राजन कोरगांवकर यांनी केले.
तातडीची बैठक बोलवावी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणेचे पालकमंत्री या नात्याने पेडणेतील रेती, चिरे, ट्रक व्यावसायिकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी एक तातडीची बैठक बोलवावी आणि या बैठकीत सविस्तर चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी राजन कोरगांवकर यांनी केली.
पर्यावरणाचा सांभाळ करून तसेच सर्व अटी व नियमांचे पालन करून हा व्यवसाय सुरू राहणे गरजेचे आहे. राज्यात रेती, चिरे बेकायदा आहेत, तर मग शेजारील राज्यांतून बेकायदा रेती, चिरे इथे कसे काय चालतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    अँटनींच्या पुत्राला गोवा सह-प्रभारीपद; पर्रीकरांच्या पुत्राबाबत भाजपची भूमिका काय?

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जाहीर केलेल्या देशव्यापी संघटनात्मक फेरबदलानंतर गोव्यात नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची गोव्याच्या प्रभारीपदी, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची गोव्याच्या सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

    Rane’s Delhi Meetings Trigger Political Buzz as Goa Heads Towards 2027

    Panaji, Sept 24: Goa Health and Town and Country Planning Minister Vishwajit Rane’s series of meetings with senior BJP and Union government figures in New Delhi has attracted political attention at a time when activity within both the ruling BJP and the Opposition is intensifying ahead of the 2027 Goa Assembly election.

    You Missed

    अँटनींच्या पुत्राला गोवा सह-प्रभारीपद; पर्रीकरांच्या पुत्राबाबत भाजपची भूमिका काय?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 10 views
    अँटनींच्या पुत्राला गोवा सह-प्रभारीपद; पर्रीकरांच्या पुत्राबाबत भाजपची भूमिका काय?

    Rane’s Delhi Meetings Trigger Political Buzz as Goa Heads Towards 2027

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 25, 2026
    • 13 views
    Rane’s Delhi Meetings Trigger Political Buzz as Goa Heads Towards 2027

    SIR Citizens’ Monitor Questions Legality of Goa Electoral Roll Revision, Blames ECI for ‘Haphazard and Arbitrary’ Process

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 24, 2026
    • 21 views
    SIR Citizens’ Monitor Questions Legality of Goa Electoral Roll Revision, Blames ECI for ‘Haphazard and Arbitrary’ Process

    24/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 24, 2026
    • 19 views
    24/09/2026 e-paper

    भाजपच्या शिस्तीची कसोटी

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 24, 2026
    • 22 views
    भाजपच्या शिस्तीची कसोटी

    ‘वोट चोरी’ वरून विरोधक आक्रमक

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 24, 2026
    • 21 views
    ‘वोट चोरी’ वरून विरोधक आक्रमक