भाजपचा गोंधळी कारभार ?

गोबेल्स नीतीचा उपयोग करून खोट्या किंवा अवास्तव गोष्टी लोकांच्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो.

राज्यातील भाजप सरकार संपूर्णतः पक्षाच्या चक्रव्युहात अडकले आहे. प्रत्येक कार्यक्रम, मेळावे, सभा आणि बैठका पक्षाच्या झेंड्याखालीच होत असल्याने पक्षविरहित जनतेचा सरकारशी संपर्कच तुटला आहे. सरकारच्या यशाच्या घोषणा केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर केल्या जात असल्याने सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेण्यासाठी कोणतेही ठोस कार्यक्रम दिसत नाहीत. त्यामुळे राज्यात “सरकार आहे तरी कुठे?” असा प्रश्न विचारला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजप कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले. मात्र, हे पक्षाचे मेळावे असल्याने फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच सहभागी होऊ शकले. उर्वरित जनतेला सरकारसोबत संवाद साधण्याची संधीच मिळाली नाही.
आता भाजप सरकारच्या केंद्रातील ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त कार्यकर्त्यांच्या सभांचे आयोजन सुरू आहे. यासाठी केंद्रातूनच विविध कार्यक्रमांची यादी पाठवली जाते आणि त्यानुसार हे कार्यक्रम आयोजित करून अहवाल सादर करावा लागतो. याच कारणामुळे राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सततच्या कार्यक्रमांमधून सुटका करून घेणे कठीण बनले आहे. मुख्यमंत्री दर आठवड्याला जनता दरबार भरवतात, मात्र तो साखळीतील त्यांच्या घरी किंवा रविंद्र भवनमध्येच होतो. त्यामुळे सरकार म्हणून सर्वसामान्य जनतेला भेटण्याची संधीच मिळत नाही. प्रत्यक्षात अख्या मंत्रिमंडळाने राज्यातील ४० मतदारसंघात भेट देऊन जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे. सरकार जनतेच्या गरजा लक्षात घेत नाही, असा आरोप होत आहे. लोकांना शौचालयांची गरज असतानाही राज्य उघड्यावर शौचमुक्त असल्याचा दावा केला जात आहे. पाण्यासाठी लोकांना अजूनही वणवण भटकावे लागत असतानाही राज्य हर घर जल योजना राबवणारे पहिले राज्य असल्याचे सांगितले जाते. रस्त्यांची दुरवस्था असतानाही गेल्या ५० वर्षांत जे झाले नाही, ते भाजपने १० वर्षांत साध्य केल्याचा दावा केला जात आहे. पदवीधारकांना कौशल्य विकासाचे धडे घेणे गरजेचे आहे तरच नोकऱ्या मिळतील असे सांगितले जात असतानाही आता ‘हर घर पदवीधर’ अशी नवी घोषणा केली जात आहे. यामधील विसंगती पाहता सरकारच गोंधळात सापडले आहे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. गोबेल्स नीतीचा उपयोग करून खोट्या किंवा अवास्तव गोष्टी लोकांच्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. या परिस्थितीत जनतेने सावध राहूनच पुढील राजकीय घटनांचा सामना करावा लागेल. भाजप स्वतः गोंधळात सापडला आहे आणि जनतेलाही गोंधळात टाकत आहे, हे स्पष्ट दिसते. या गोंधळामुळे राज्याचे नुकसान होत असून ही परिस्थिती सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • Related Posts

    या मातीशी प्रतारणा नको!

    श्रेष्ठींची मर्जी राखण्यासाठी गोव्याचे भवितव्य धोक्यात घालण्याची ही कृती म्हणजे या मातीशी प्रतारणाच ठरणार आहे. नगर नियोजन खात्याकडून सध्या कलम ३९(ए) अंतर्गत झोन बदलाचे शस्त्र वापरून सरसकट जमिनींचे रूपांतरण करण्याचा…

    भाजप महिला जागी हो !

    भाजपमधील महिला संघटनात्मक पातळीवर सक्रिय असूनही समाजातील महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांशी संबंधित विषयांवर गप्प का राहतात, हा खरा चर्चेचा विषय आहे. महिला हीच खरी भाजपची ताकद आहे. भाजपाच्या यशात…

    You Missed

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 10 views
    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 17 views
    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 18 views
    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 9 views
    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    25/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 22 views
    25/03/2026 e-paper

    कंत्राटी कामगारांचा १४ रोजी जन उठाव

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 22 views
    कंत्राटी कामगारांचा १४ रोजी जन उठाव