श्वेत सावंत याच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

सावर्डेतील युवकाची कर्करोगाशी झुंज

गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)

सावर्डे येथील श्वेत सावंत यांच्यावर दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. या उपचाराचा खर्च मोठा होणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी आवाहन केले आहे.
ड्रम वाजवण्याची कला आत्मसात केलेले श्वेत सावंत हे एक उत्कृष्ट कलाकार आहेत. संगीत ही त्यांची आवड आहे. त्याला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मुंबई येथील टाटा मेमोरियल इस्पितळात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. तिथून बरा होऊन तो घरी परतला होता. मात्र, आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने सध्या त्याच्यावर दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात उपचार सुरू आहेत.
आधीच उपचारावर मोठा खर्च झाल्यानंतर आता नव्या खर्चाचे एक मोठे आव्हान श्वेत सावंत याच्या कुटुंबावर कोसळले आहे. या उपचारासाठी विविध चाचण्या, औषधोपचार तसेच कायम देखरेख यासाठी अंदाजे ४० ते ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे श्वेत सावंत याचे कुटुंबीय तसेच मित्रमंडळींनी त्याला मदत मिळवण्यासाठी आवाहन केले आहे.
श्वेत सावंत याच्या मित्रांनी सोशल मीडियावरून मदतीसाठी आवाहन करणारे अनेक व्हिडिओ जारी केले आहेत. सर्वांचा प्रिय आणि एक उत्कृष्ट कलाकार म्हणून श्वेत सावंत याची ओळख असून, त्याच्या आयुष्यावर आलेल्या या कठीण प्रसंगामुळे अनेकांनी दुःख व्यक्त करत त्याला मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

  • Related Posts

    चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!

    नेपाळमधील महापुरानंतर हिमनदीजन्य तलावांचा धोका चर्चेत; भारतासाठीही सतर्कतेचा इशारा नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला…

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    “महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पाहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा.” जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनामुळे सरकारसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र…

    You Missed

    Goa Congress Protests FIR Against Rahul Gandhi, Demands Action Over Alleged ‘Purification’ Ritual in Uttarakhand

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 9 views
    Goa Congress Protests FIR Against Rahul Gandhi, Demands Action Over Alleged ‘Purification’ Ritual in Uttarakhand

    Sardesai’s ‘Hat-Trick’ Jibe Sparks Yuri Alemao Retort Over Opposition Alliance

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 13 views
    Sardesai’s ‘Hat-Trick’ Jibe Sparks Yuri Alemao Retort Over Opposition Alliance

    Goa Cabinet Clears Regularisation of Contractual Education Staff With 10+ Years’ Service

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 17 views
    Goa Cabinet Clears Regularisation of Contractual Education Staff With 10+ Years’ Service

    AAP Targets BJP Over IDC ‘Scam’, Contract Jobs, Unemployment and Corruption in Goa Assembly

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 17 views
    AAP Targets BJP Over IDC ‘Scam’, Contract Jobs, Unemployment and Corruption in Goa Assembly

    Vijai Sardesai Flags Contractual Job Crisis, Questions Goa Government’s ‘Model Employer’ Claim

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 14 views
    Vijai Sardesai Flags Contractual Job Crisis, Questions Goa Government’s ‘Model Employer’ Claim

    Bengaluru Man Arrested in “35.90 Lakh ‘Digital Arrest’ Fraud Targeting Margao Resident

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 31, 2026
    • 22 views
    Bengaluru Man Arrested in “35.90 Lakh ‘Digital Arrest’ Fraud Targeting Margao Resident