गल्लीबोळात मतदारांना पाकिटांचा वर्षाव

फोनाफोनी, धमक्या, बैठकांच्या आग्रहांचा धुमाकुळ

गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी)

निपक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणुका घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मंत्र अखेर उघडपणे पायदळी तुडवला गेला आहे. सत्ताधारी पक्ष आणि सरकारचे वेगवेगळे घटक जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आचारसंहितेचा भंग करत असून या परिस्थितीसमोर विरोधक हतबल झाले आहेत.
भरारी पथके निष्कामी
राज्य निवडणूक आयोगाने स्थापन केलेली भरारी पथके पूर्णपणे निष्कामी ठरली आहेत. यापूर्वी पंचायत, जिल्हा पंचायत तसेच पालिका निवडणुकांच्या आचारसंहितांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते. यावेळी मात्र जिल्हा पंचायत निवडणुका सर्वच राजकीय पक्षांनी गंभीरतेने घेतल्यामुळे आयोगाचा बेफिकीरपणा सत्ताधारी पक्ष आणि सरकारी घटकांसाठी फायद्याचा ठरला आहे. जिल्हा पंचायतीसाठी अनेक मंत्री, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने उघडपणे पैशांचा वापर सुरू आहे. अनेक ठिकाणी पार्ट्या आणि गुप्त बैठकांचा सपाटा सुरू असल्याच्या खबरी मिळत आहेत.
महिला मंडळांची चांदी
राज्यात निवडणूक काळात महिला मतदारांवरच भाजपची अधिक भिस्त असते. महिला मतदारांशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्याशी नियमित संवाद साधण्याची एक पद्धत त्यांनी तयार केली आहे. यात अंगणवाडी सेविकांचा राजकीय वापर केला जातोच; परंतु त्याचबरोबर ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तयार केलेल्या महिला स्वयं-सहाय्य गटांच्या रचनेचा उपयोग अनेक राजकीय नेते करतात. सभा, बैठकांना महिलांची गर्दी जमविण्यासाठी तसेच निवडणुकीत पैशांची पाकिटे महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रचनेचा फायदा घेतला जातो. भाजप तसेच काही अन्य पक्ष आणि अपक्षांकडून मोठ्या प्रमाणात महिलांना पैशांची पाकिटे देण्याचा सपाटा सुरू झाला आहे. प्रत्येक महिला गट किंवा वैयक्तिक महिलांना किमान ५०० रुपयांची नोट देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती विविध भागांतून मिळते. अनेक ठिकाणी हे पैसे घेऊनही सरकारविरोधात मतदान करणार असल्याचा निर्धार महिलांनी केल्याचे सांगितले जाते.
पेडणेत टॅक्सीकारांना धमक्या
पेडणे मतदारसंघातील तोरसे जिल्हा पंचायत मतदारसंघात मिशन फॉर लोकल, पेडणे तर्फे टॅक्सी व्यवसायिक गजानन गडेकर यांना अपक्ष उमेदवारी दिली आहे. त्यांना मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने भाजप नेत्यांनी आता या टॅक्सीकारांना धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे. नव्याने दिलेले काऊंटर काढून घेतले जातील तसेच पोलिसांत वेगवेगळ्या आंदोलनावेळी दाखल झालेल्या तक्रारी मागे घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून त्यांच्यात भीती निर्माण केली जात आहे. भाजपकडून याकामी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा उपयोग केला जात असल्याचीही टीका सुरू झाली आहे. या धमकी सत्रामुळे टॅक्सी व्यवसायिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात असून गजानन गडेकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही हस्तक्षेप करून भाजपसाठी मतदान करण्याचे आवाहन केल्याची खबर असून आता मतदार नेमके काय करतात हे २२ रोजी स्पष्ट होणार आहे.
हॅलो, पैसे खात्यात जमा झाले बरं का!
एकीकडे महिलांना पैशांची पाकिटे वाटपाचे काम जोरात सुरू झाले आहे, तर दुसरीकडे बँक खात्यात गृहआधारचे थकित पैसे जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अनेकांचे दोन ते तीन महिन्यांचे अडकलेले पैसे आता निवडणुकीच्या तोंडावर खात्यात जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अनेक मतदारांना हे पैसे पोहोचल्याचे फोन आमदार, मंत्र्यांच्या कार्यालयातून करण्यात येत असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.

  • Related Posts

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Panaji: The Goa Pradesh Mahila Congress has extended support to victims and families affected by the alleged Curchorem sex scandal, raising serious concerns over institutional gaps and the lack of…

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ८०, ९२६ चौ. मीटर झोन बदलासाठी शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील ८०,९२६ चौ. मीटर…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 15 views
    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 15 views
    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 26 views
    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 23 views
    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 28 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 30 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…