जेनिटोचा आश्रयदाता कोण ?

जेनिटो आणि सरकारमधील एका राजकीय नेत्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजपने यापूर्वी हे उघड केले असून, त्यामुळे या संबंधांचे रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाशी काही संबंध आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजकीय आश्रयाशिवाय कोणताही गुंड अधिक काळ आपला डेरा शाबूत ठेवू शकत नाही. राजकीय पाठबळ मिळाल्यावर पोलिसांचे अभय आपोआप मिळते आणि त्यातूनच गुंड–राजकारणी–पोलिस अशी साखळी तयार होते. अशा गुंडांना आश्रय देणारे नेते नेहमीच सत्तेच्या बाजूने राहण्यासाठी धडपडत असतात. सत्तेत राहिल्यावरच त्यांना ही यंत्रणा टिकवून ठेवणे शक्य होते; अन्यथा हा डोलारा कोसळण्याची शक्यता असते. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात गोव्यातील गुन्हेगारी जगतातील अव्वल गुन्हेगार जेनिटो कार्दोझो याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख दहा गुन्हेगारांमध्ये अग्रस्थानी असलेल्या जेनिटोला पोलिसांनी अटक केल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. या प्रकरणामुळे अनेकांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या कार्यकाळातील गुंडांविरोधातील कारवाईची आठवण केली. मुख्यमंत्र्यांनी ती आठवण पुसून टाकत जेनिटोच्या अटकेद्वारे आपल्या धाडसाची नोंद घेतली, असे अनेकांचे निरीक्षण आहे. जेनिटोला अटक झाली की तो शरण आला, असा सवाल काही निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित करत आहेत. जेनिटोला राजकीय आश्रय आहे, हे सर्वश्रुत आहे. त्याचा राजकीय गॉडफादर कोण, याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. रामा काणकोणकर याचे जेनिटोकडे नेमके कोणते वैयक्तिक शत्रुत्व होते? कदाचित रामा काणकोणकर यांचा सामाजिक लढा एखाद्या राजकीय नेत्याला अडचणीचा वाटला असावा आणि त्याचा वचपा काढण्यासाठीच जेनिटोमार्फत हा हल्ला घडवून आणला गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेनिटोने हल्ला केला असला तरी या हल्ल्याचा खरा मास्टरमाईंड कुणीतरी वेगळाच आहे, अशी चर्चा सुरू आहे. जेनिटो हा गोव्यातील गुन्हेगारी जगतातील डॉन मानला जातो. त्याची एट, जीवनशैली आणि राहणीमान हेवा वाटावा असे आहे. राज्यातील किनारी भागातील मोठ्या हॉटेल्स आणि पर्यटन आस्थापनांकडून खंडणी गोळा करण्याची जबाबदारी जेनिटोकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजकीय नेत्यांसाठी खंडणी गोळा करणाऱ्या जेनिटोला सरकार रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात खरोखरच आरोपी ठरवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. जेनिटोला अटक केल्यानंतर पोलिस या प्रकरणाची नेमकी काय कथा तयार करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, रामा काणकोणकर यांनी अद्याप पोलिसांना जबानी दिली नसल्याचे वृत्त आहे. त्यांची जबानी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. रामा काणकोणकर यांची जेनिटोसोबत दुश्मनी असेल, तर ती कोणत्या कारणावरून आणि नेमके काय घडले, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे. अशी माहिती उघड होणे अनेकांसाठी अडचणीचे ठरू शकते. पोलिस हे प्रकरण जेनिटोभोवतीच गुंडाळण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी एक राजकीय मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे, जी पोलिस आणि सरकारकडे वळवण्याचा प्रयत्न होत आहे. जेनिटो आणि सरकारमधील एका राजकीय नेत्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजपने यापूर्वी हे उघड केले असून, त्यामुळे या संबंधांचे रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाशी काही संबंध आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात झटपट कारवाई केली, हे कौतुकास्पद आहे. मात्र ही कारवाई केवळ लोकांचा रोष टाळण्यासाठी मर्यादित राहू नये. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली, तरच या कारवाईला खरे महत्त्व प्राप्त होईल. पोलिस हे आव्हान स्वीकारतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

  • Related Posts

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मात्र आंदोलन मागे घेण्याच्या महत्त्वाच्या विषयावर मतदारसंघाचे प्रतिनिधीच गैरहजर असतील तर पक्षात गोंधळ असल्याचे दिसते. हा गोंधळ दूर होऊन मिराबागवासीयांचे शंकानिरसन व्हावे आणि हा विषय यशस्वीरित्या सुटावा, हीच अपेक्षा आहे.…

    या मातीशी प्रतारणा नको!

    श्रेष्ठींची मर्जी राखण्यासाठी गोव्याचे भवितव्य धोक्यात घालण्याची ही कृती म्हणजे या मातीशी प्रतारणाच ठरणार आहे. नगर नियोजन खात्याकडून सध्या कलम ३९(ए) अंतर्गत झोन बदलाचे शस्त्र वापरून सरसकट जमिनींचे रूपांतरण करण्याचा…

    You Missed

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 14 views
    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 20 views
    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 21 views
    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 25 views
    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 24 views
    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 17 views
    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi