कुळे–पिकलेवाडीत वनजमिनीत चिरेखाणी

महसूल, वनाधिकाऱ्यांचा कानाडोळा

गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)

राज्यात वनखात्याच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असताना, कुळे–पिकलेवाडी येथे वनखात्याच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या चिरे उत्खनन सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यापूर्वी याठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा चिरेखाणीविषयी खाण खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर खाण खात्याने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा ह्याच अज्ञात लोकांकडून याठिकाणी बेकायदा चिरेखाणीचा उद्योग सुरू करण्यात आल्यामुळे, अगदी वरपासून खालपर्यंत सरकारी यंत्रणा या बेकायदा कृत्यात सहभागी असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.
वास्तविक महसूल अधिकारी आणि वनाधिकारी यांनी या बेकायदा चिरेखाणीविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे. तरीही हे अधिकारी खाण खात्याकडे अंगुलीनिर्देश करून आपली जबाबदारी झटकत आहेत. या प्रकरणात अनेक बड्या मंडळींचा सहभाग असल्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कुणीही तक्रार करण्याचे धाडस केल्यास त्याला धमक्या दिल्या जातात, आणि यामुळेच हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे.
रोज १०–१२ फेऱ्या
या ठिकाणी मागील ५ ते ६ महिन्यांपासून पुन्हा बेकायदा चिरेखाणी सुरू आहेत. रोज साधारणतः १० ते १२ चिरे ट्रक फेऱ्या मारतात, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या व्यवसायात सरकारी सेवेत असलेली एक व्यक्तीच मुख्य सूत्रधार आहे. या व्यक्तीचे पोलिसांशी थेट संबंध असल्यामुळे त्याच बळावर त्याचा हा कारभार सुरू आहे. “सरकार आपल्या खिशात आहे” अशा तोऱ्यात ही व्यक्ती वागत असून सरळपणे लोकांना धमक्या देते, असेही अनेकांनी सांगितले. या प्रकरणाची दखल सरकार घेईल का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

  • Related Posts

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Panaji: The Goa Pradesh Mahila Congress has extended support to victims and families affected by the alleged Curchorem sex scandal, raising serious concerns over institutional gaps and the lack of…

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ८०, ९२६ चौ. मीटर झोन बदलासाठी शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील ८०,९२६ चौ. मीटर…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 17 views
    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 16 views
    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 28 views
    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 25 views
    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 30 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 32 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…