सांगेतील वादावर पडदा

कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर झाल्याचा दामू नाईक यांचा दावा

गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी)

समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दामू नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई आणि सांगे मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.

सांगे मतदारसंघाच्या आरक्षणाचा विषय कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून, फळदेसाई यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही पक्षाने दिली. सांगेत भाजपचा जो उमेदवार असेल, त्याच्यासाठी आपण काम करणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

रविवारच्या घटनेबाबत कार्यकर्त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. मात्र, पक्षाने आमचे समाधान केल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर सांगेतील राजकीय वादावर तूर्तास पडदा पडल्याचे चित्र आहे.

  • Related Posts

    Private Bus Operators Seek CM’s Directive to Halt Further KTCL EV Bus Induction

    Panaji, August 2: RTI activist Sudip Narayan Tamankar has written to Chief Minister Dr. Pramod Sawant requesting an official directive restraining the Kadamba Transport Corporation Ltd. (KTCL) from hiring or…

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन सादर गांवकारी,दि.२ (प्रतिनिधी) गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे बुधवारी राज्यपाल पी.एस.अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर निवेदन सादर करत तातडीने घटनात्मक हस्तक्षेप…

    You Missed

    अति तिथे माती !

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 22 views
    अति तिथे माती !

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 16 views

    सांगेतील वादावर पडदा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 14 views
    सांगेतील वादावर पडदा

    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 11 views
    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    10/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 11 views
    10/08/2026 e-paper

    स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 20 views
    स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन