स्वप्नेश शेर्लेकर यांना मोबाईलवरून धमकी
महानंद अस्नोडकर विरोधात तक्रार दाखल

गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी): आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना मोबाईलवरून धमकी देण्याची घटना आज घडली. पर्वरी येथील महानंद अस्नोडकर नामक व्यक्तीने आपण भाजपचा नेता असल्याचा दावा करत स्वप्नेश शेर्लेकर यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला.


या घटनेबाबत स्वप्नेश शेर्लेकर यांनी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अलिकडेच शेर्लेकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्या व्हिडिओचा संदर्भ देत अस्नोडकर यांनी त्यांना धमकावले आणि शिवीगाळ केली. मोबाईलवरील हा संवाद रेकॉर्ड करून पोलिसांना सादर करण्यात आला आहे.
याआधी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण गाजत असतानाच हे नवीन प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीला फोन करून उद्या, शुक्रवार दिनांक २६ रोजी पोलिस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • Related Posts

    कंत्राटी कामगारांचा १४ रोजी जन उठाव

    सेवा नियमितीकरणावरून प्रचंड असंतोष गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम खात्यात सोसायटीअंतर्गत रोजंदारी, कंत्राटी तसेच तात्पुरत्या दर्जावर काम करणाऱ्या सुमारे २ हजार कामगारांनी सेवा नियमितीकरणाच्या मागणीसाठी जन उठाव करण्याचा निर्णय…

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Panaji: The Goa Pradesh Mahila Congress has extended support to victims and families affected by the alleged Curchorem sex scandal, raising serious concerns over institutional gaps and the lack of…

    You Missed

    25/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 11 views
    25/03/2026 e-paper

    कंत्राटी कामगारांचा १४ रोजी जन उठाव

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 19 views
    कंत्राटी कामगारांचा १४ रोजी जन उठाव

    या मातीशी प्रतारणा नको!

    • By Gaonkaari
    • मार्च 25, 2026
    • 21 views
    या मातीशी प्रतारणा नको!

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 18 views
    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 19 views
    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 32 views
    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात