विरोधकांकडून सरकारला मोकळे रान

युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता गप्प का?

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)

राज्य सरकारच्या अनेक गोष्टींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त बनली असतानाही विरोधक मात्र सरकारवर वचक ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष या नात्याने काम करणारे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्याकडूनही काहीच हालचाली होत नसल्यामुळे विरोधी गटांत सामसुम पसरली आहे.
पीएसी, पीयुसी निष्फळ
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी सभागृहाच्या विविध समित्या स्थापन केल्या होत्या. सर्वांत महत्त्वाची समिती म्हणजे लोक लेखा समिती असून या समितीचे अध्यक्षपद केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्याकडे आहे तर लोक उपक्रम समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याकडे देण्यात आले आहे. या समिती स्थापन करून आता दोन वर्षे उलटली तरीही अद्याप अहवाल सादर झालेला नाही. सरकारच्या कारभारावर वचक ठेवण्याचे काम या समित्यांमार्फत करण्याचे अधिकार आहे परंतु विरोधकांना सरकारवर वचक ठेवण्याची इच्छाच नसून सरकारला रान मोकळे ठेवण्यास त्यांची मंजूरी आहे की काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
कसा ठेवता येतो वचक
लोक लेखा समितीच्या मार्फत विविध सरकारी प्रकल्पांच्या कारभारावर नजर ठेवता येते. ह्यात सार्वजनिक बांधकाम प्रकल्प, कला अकादमी नुतनीकरण प्रकल्प, क्रीडा स्टेडियम, गोमेकॉ कंत्राटे, वाहतूक खात्यातील भ्रष्टाचार, किनारे व्यवस्थापन आणि सुरक्षा आदी कंत्राटांच्या कामांतील त्रुटी आणि गैरकारभार उघड करण्याची संधी या समितीला असते. लेखापालांनी आपल्या अहवालात नोंदवलेल्या निरीक्षणांबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्याचे अधिकार या समितीला असते. सरकारच्या आर्थिक व्यवहारांच्या हिशेबावर नजर ठेवणे हे या समितीचे काम असते आणि त्यामुळे ही समिती सरकारवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी लोक लेखा समितीमार्फतच खाण घोटाळा उघड केला होता.
विरोधी नेते गप्प का?
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची चुप्पी हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यात अनेक विषय जनतेला भेडसावत असताना विरोधी पक्षनेते मात्र मुग गिळून गप्प असल्याची नाराजी सर्वत्र पसरली आहे. लोक उपक्रम समितीचे अध्यक्ष या नात्याने स्मार्टसिटीची कामे, औद्योगिक विकास महामंडळाचे भूखंड वाटप, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा कारभार तसेच पर्यटन महामंडळाच्या कारभारावरही वचक ठेवण्याची संधी असताना युरी आलेमाव काहीच कृती करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या समिती काही मोजक्याच बैठका झाल्या असल्या तरी अद्याप एकही अहवाल मात्र सादर करण्यात आला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

भाजपची टोलवाटोलवी
म्हादईची पाहणी करण्यासाठी आपण कर्नाटकच्या सभापतींकडून परवानगी मागू शकत नाही असे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार पाणी प्रश्नावर वेळ वाया घालवत असल्याची टीका त्यांनी केली.
जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ८ जानेवारी रोजी सभागृह समितीची दुसरी बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी या भेटीसंदर्भात सांगितले होते. आता सभापती म्हणतात की आपल्याला पत्रच पोहचले नाही. यावरून भाजपची टोलवाटोलवी सुरू असल्याचेच स्पष्ट होते, असेही आलेमाव म्हणाले.

  • Related Posts

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Panaji: The Goa Pradesh Mahila Congress has extended support to victims and families affected by the alleged Curchorem sex scandal, raising serious concerns over institutional gaps and the lack of…

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ८०, ९२६ चौ. मीटर झोन बदलासाठी शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील ८०,९२६ चौ. मीटर…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 15 views
    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 15 views
    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 26 views
    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    • By Gaonkaari
    • मार्च 24, 2026
    • 23 views
    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 29 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 31 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…